टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने गुवाहाटीमध्ये भारतातील सर्वात मोठ्या बॅडमिंटन स्टेडियम्सपैकी एकाच्या बांधकामासाठी उत्पादने पुरवली
गुवाहाटी : कलर कोटेड रुफिंग आणि क्लॅडिंग सोल्युशन्समध्ये आघाडीची कंपनी टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलला गुवाहाटीमध्ये बीएआय नॅशनल सेंटर ऑफ एक्सेलेन्स फॉर बॅडमिंटनच्या बांधकामात दिलेल्या लक्षणीय योगदानाविषयी घोषणा करताना खूप आनंद होत आहे. आसामचे माननीय मुख्यमंत्री श्री हिमंत बिस्वा सरमा यांच्या हस्ते आज या स्टेडियमचे उदघाटन करण्यात आले.
२१००० चौरस मीटर LYSAGHT KLIPLOK® 700 डबल स्किन रुफिंगचा पुरवठा करून टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने भारतातील या सर्वात मोठ्या बॅडमिंटन स्टेडियमच्या विकासात एक महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
LYSAGHT KLIPLOK® 700 प्रोफाइल कन्सील्ड रूफ आणि वॉल क्लॅडिंग सिस्टिम्सच्या पुढील पिढीचे प्रतिनिधित्व करतात. बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या इतर प्रोफाईल्सच्या तुलनेत हे नवे रुफिंग सर्वोत्कृष्ट अपलिफ्ट परफॉर्मन्स आणि अधिक रुंद स्पॅन देतात. अतिशय आकर्षक, बोल्ड रिब्ससह LYSAGHT KLIPLOK® 700 मजबुती व टिकाऊपणाचे प्रतीक आहे.
भारतात बॅडमिंटन सुविधांच्या विकासात हे स्टेडियम एक महत्त्वाचा टप्पा आहे, खेळाडू आणि प्रेक्षकांना याठिकाणी अत्याधुनिक सुविधांचे लाभ घेता येतील.
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलचे सोल्युशन्स बिझनेसचे व्हाईस प्रेसिडेंट श्री. सी आर कुलकर्णी यांनी सांगितले, "टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने गुवाहाटीमध्ये नॅशनल सेंटर ऑफ एक्सेलेन्स फॉर बॅडमिंटनसाठी आपल्या उत्कृष्ट आधुनिक डबल स्किन रुफिंगचा पुरवठा करून, बांधकाम उद्योगक्षेत्राच्या नव्याने निर्माण होत असलेल्या गरजा पूर्ण करण्यासाठी उच्च गुणवत्तापूर्ण सोल्युशन्स प्रदान करण्याची आपली वचनबद्धता पुन्हा एकवार सिद्ध केली आहे. भारतात जागतिक दर्जाच्या क्रीडा सुविधांच्या विकासात योगदान देताना कंपनीला खूप अभिमान वाटत आहे. आम्हाला खात्री आहे की, देशभरातील बॅडमिंटनप्रेमींसाठी हे स्टेडियम एक प्रमुख केंद्र बनेल."
भारतात स्टेडियम्स आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सेससाठी इतर अनेक ऑर्डर्स टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलकडे आलेल्या असून, भारतात क्रीडा सुविधांच्या बांधकामात नवी क्रांती घडवून आणण्यासाठी ही कंपनी सज्ज आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: