डी .वाय.पाटील युनिव्हर्सिटीच्या 'आरंभ' मध्ये मार्गदर्शन सत्रे
आंबी : डी.वाय.पाटील युनिव्हर्सिटी (आंबी,पुणे) यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी आयोजित 'आरंभ 'या फ्रेशमन ओरिएंटेशन प्रोग्रॅमच्या तिसऱ्या दिवशी ११ ऑगस्ट रोजी आय टी सी इन्फोटेक कंपनीचे व्यवस्थापक प्रमोद हंकारे,आहारतज्ज्ञ प्राची कुलकर्णी,सायबर सिक्युरिटी तज्ज्ञ हेरॉल्ड डिकोस्टा,डॉ.विजय वाढाई,डॉ.पूनम रासकर डी.वाय.पाटील युनिव्हर्सिटीच्या कुलगुरू डॉ.सायली गणकर यांनी मार्गदर्शन केले.प्रा.प्रणव रंजन यांनी प्रास्ताविक केले.डॉ.पूजा शर्मा,प्रा.विकास औटी यांनी स्वागत केले.प्रा.सचिन देसाई,प्रा.अंजली यांनी आभार मानले.
दरम्यान,९ ऑगस्ट २०२३ रोजी 'आरंभ' या उपक्रमाचे उदघाटन करण्यात आले.१८ ऑगस्टपर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.अभियांत्रिकी ,व्यवस्थापनशास्त्र,आर्किटेक्चर,फार्मसी, लॉ,डिझाईन आणि हॉटेल मॅनेजमेंट विद्याशाखांच्या विद्यार्थ्यांचे स्वागत या कार्यक्रमातून करण्यात आले .विद्यार्थ्यांच्या कारकिर्दीची पायाभरणी होण्यासाठी आणि वैयक्तिक विकासाची,व्यक्तिमत्व विकासाची योग्य सुरुवात म्हणून या कार्यक्रमाचे नियोजन केले जाते.या उपक्रमाचे हे चौथे वर्ष आहे.शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी वेगवेगळ्या क्षेत्रातील यशस्वी व्यक्तिमत्व,रोल मॉडेल त्यांच्यासमोर यावीत,यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.
Reviewed by ANN news network
on
८/१३/२०२३ ०४:३७:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: