रोहा : रोहा तालुक्यातील धामणसई येथील स्मशानभूमीत क्रिया करून अघोरीविद्येच्या सहाय्याने पैशांचा पाऊस पाडण्याच्या प्रयत्नात असलेल्या ७ जणांना शनिवारी रात्री रोहा पोलिसांनी ताब्यात घेतले. दोघेजण पसार होण्यात यशस्वी झाले. यामध्ये या प्रकरणातील म्होरक्याचाही समावेश आहे. अटक केलेल्यात बहुतेकजण रत्नागिरी जिल्ह्यातील आहेत.
संतोष पालांडे वय ५० रा. रत्नागिरी, प्रदीप पवार वय ६० रा. रत्नागिरी, प्रवीण खांबल वय ४७ रा. रत्नागिरी, सचिन सावंतदेसाई वय ४९ रा. रत्नागिरी, दीपक कदम व ४१ रा. रत्नागिरी, मिलिंद साळवी व ५१ रा. रत्नागिरी, राजेंद्र तेलंगे वय ४२ रा. हेटवणे यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यासह पसार झालेल्या दोन अनोळखी व्यक्तींविरोधात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष व आघोरी प्रथा, जादूटोणा यांना प्रतिबंध करणे, समूळ उच्चाटन करणे अधिनियम २०१३ चे कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर आणि त्यांच्या सहका-यांनी ही कारवाई केली.
मिळालेल्या माहितीनुसार रोहा तालुक्यातील धामणसई येथे बौद्धवाडी शेजारील स्मशानभूमी व माऊली कृपा एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत काही अनोळखी लोक शनिवारी रात्री फ़ुले, अबिर, गुलाल, लिंबू, टाचण्या घेऊन काही क्रिया करत असल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाली. ग्रामस्थांनी ही बाब रोहा पोलिसांना कळविली. तसेच; तेथे जाऊन त्या लोकांना पकडले. या वेली नागरिकांशी झटापट करून काहीजण पळून जाण्यात यशस्वी ठरले. त्यात या प्रकरणाच्या सूत्रधाराचा समावेश असल्याचे समजते.
पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर आणि त्यांचे सहकारी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
Reviewed by ANN news network
on
८/१३/२०२३ ०८:३०:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: