भारताची एकात्मता बलशाली करू!; माझी माती माझा देश कार्यक्रमात उपस्थितांचा निर्धार

 


पिंपरी :  भारताची एकात्मता बलशाली करू”, देशाचे संरक्षण करण्याप्रती

सन्मान बाळगू, भारतात २०४७ पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनवण्याचे स्वप्न साकार

करु, गुलामीची मानसिकता मुळापासून नष्ट करू, देशाच्या समृद्ध वारशाचा गौरव करू तसेच

देशाचे नागरिक म्हणून सर्व कर्तव्याचे पालन करू अशी पंचप्रण शपथ स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबीय,

युध्दांतील शहीद जवानांचे कुटुंबीयांनी त्याचप्रमाणे आजी माजी सैनिकांनी, लोकप्रतिनिधीं आणि

आयुक्त तसेच अधिका-यांसमवेत घेण्यात आली.

भारत ही शूर वीरांची भूमी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या

या भूमीमध्ये राहत असताना देशातील तसेच पिंपरी चिंचवड शहरातील स्वातंत्र्य सैनिक, शहीद

जवान सैनिकांनी केलेल्या कार्याचा सार्थ अभिमान वाटत असून देशाच्या सीमांचे रक्षण करणारे

जवान, देशांतर्गत संरक्षण करणारे जवान तसेच पोलिस अधिकारी अग्निशामक, सुरक्षा दलाच्या

उत्तम कामगिरीमुळे देश सुरक्षित राहिला असल्याचे मत खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे यांनी

व्यक्त केले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवपूर्तीनिमित्त  माझी माती माझा देश हा कार्यक्रम पिंपरी चिंचवड

महानगरपालिकेच्या वतीने १३ ते १८ ऑगस्ट या कालावधीत विविध उपक्रमांद्वारे राबविण्यात

येत असून आज ग.दि.माडगूळकर नाट्यगृहात महान क्रांतीकारकांच्या माहितीसह शेकडो फोटोंच्या

प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले आणि सैनिकहो तुमच्यासाठीया कार्यक्रमात २२ स्वातंत्र्य

सैनिकांच्या कुटुंबियांचा तसेच युद्धातील नऊ शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा सत्कार खासदार

श्रीरंग उर्फ आप्पा बारणे, आमदार उमा खापरे, अश्विनी जगताप आणि आयुक्त शेखर सिंह यांच्या

हस्ते  शाल, आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला त्यावेळी त्यांचेप्रती कृतज्ञता व्यक्त

करत बोलताना खासदार बारणे यांनी .महापालिकेने आयोजित केलेल्या कार्यक्रमाबाबत समाधानही

व्यक्त केले

या कार्यक्रमास लेफ्टनंट कर्नल मिथिलेश सिंग सेना मेडल, कॅप्टन हरी ओम सेना मेडल,

३३० ब्रिगेड औंध व कॉलेज ऑफ मिलिटरी इंजीनियरिंग दापोडीचे डेप्युटी कमांडंट अशोक संकला,

एन डी आर एफ, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप, पोलीस उपायुक्त वसंत

परदेशी, मुख्य सुरक्षा अधिकारी मेजर उदय जरांडे सेना मेडल, आजी माजी ७५६ सैनिक,

अग्निशामक दलाचे इंगोले, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, माजी नगरसदस्य

नामदेव ढाके, उपायुक्त रविकिरण घोडके, मिनीनाथ दंडवते, क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे,

सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, कार्यकारी

अभियंता राजेंद्र शिंदे आदी उपस्थित होते.

 

आमदार उमा खापरे यांनी स्वातंत्र्य सैनिकांचे तसेच शहीद जवानांचे कुटुंबीय, आजी-माजी

सैनिक यांच्या देशभक्तीला आणि त्यांच्या कामगिरीला सॅल्युट करते अशा शब्दात त्यांच्याप्रती

आदरभाव व्यक्त केला.

देशाप्रती कर्तव्य बजावत असताना आपलं माणूस जाणं ही खंत वीरपत्नी, वीरमाता यांच्या

मनात सतत येत असते असे सांगून त्यांच्या पाठीशी आपण कायम असल्याचे आमदार अश्विनी

जगताप यांनी सांगितले.

आयुक्त शेखर सिंह यांनी बोलताना केंद्र शासनाच्या सूचनेनुसार माजी माती माझा देशहा

उपक्रम महापालिका राबवत असल्याचे सांगितले. देशातील हजारो स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागामुळे,

बलिदानामुळे देश स्वतंत्र झाला तर शहीद जवानांनी युद्धात केलेल्या कामगिरीमुळे देशाचे संरक्षण

झाले असे सांगून त्यांचे प्रती कृतज्ञता व्यक्त केली तसेच सैनिक दिवाळीत देशांच्या सीमांचे

संरक्षण करत असतात म्हणून आपण दिवाळी सारखा सण सुरक्षित आणि आनंदाने साजरा करू

शकतो असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच वृक्षारोपण, पंचप्रण, हेरिटेज वॉक यासारख्या विविध

कार्यक्रमांची सविस्तर माहितीही दिली

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, सूत्रसंचालन जनता संपर्क

अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी तर आभार उप आयुक्त मिनीनाथ दंडवते यांनी मानले.


भारताची एकात्मता बलशाली करू!; माझी माती माझा देश कार्यक्रमात उपस्थितांचा निर्धार भारताची एकात्मता बलशाली करू!; माझी माती माझा देश कार्यक्रमात उपस्थितांचा निर्धार Reviewed by ANN news network on ८/१४/२०२३ १०:२३:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".