होंडा रेसिंग इंडिया टीम २०२३ इदेमित्सु होंडा इंडिया टॅलेंट कप NSF250R च्या दुसऱ्या फेरीसाठी सज्ज

 


 

चेन्नई :  आपल्या दमदार कामगिरीने पहिली फेरी गाजवल्यानंतर होंडा रेसिंग इंडिया रायडर्स २०२३ इदेमित्सु होंडा इंडिया टॅलेंट कपच्या दुसऱ्या फेरीसाठी सज्ज होत आहेत. ही फेरी चेन्नईतील मद्रास मोटर रेसट्रॅकवर (एमएमआरटी) होणार आहे.

जबरदस्त कौशल्य आणि निश्चयाचे दर्शन पहिल्या फेरीत झाल्यानंतर इदेमित्सु होंडा इंडिया टॅलेंट कपमधील स्पर्धा दुसऱ्या फेरीत आणखी तीव्र होणार आहे. उद्घाटनपर रेसमध्ये कविन क्विंतल यांनी ट्रॅकवर असामान्य कौशल्याचे दर्शन घडवत इदेमित्सु होंडा इंडिया टॅलेंट कप NSF250R ओपन क्लासमधील आपले स्थान बळकट केले.

दरम्यान रक्षित यांनी केलेल्या प्रभावी प्रयत्नांमुळे त्यांना दुसरे स्थान मिळालेतर प्रकाश कामत यांनी तिसरे स्थान मिळवले.

दुसऱ्या फेरीविषयी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाच्या विक्री आणि विपणन विभागाचे संचालक श्री. योगेश माथुर म्हणाले, या वीकेंडला चेन्नईतील मद्रास मोटर रेसट्रॅकवर होत असलेल्या इदेमित्सु होंडा इंडिया टॅलेंट कपसाठी सज्ज होत असतानाच रेसट्रॅकवर तीव्र स्पर्धा, असामान्य कौशल्यपॅशन यांचा मिलाफ पाहाण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. आमच्या गुणवत्तापूर्ण रायडर्सनी त्यांच्या क्षमतांवर अजून मेहनत घेतली असून या बहुप्रतीक्षीत कार्यक्रमात आपली दृढता आणि वेग दाखवण्यासाठी ते उत्सुक आहेत. चाहत्यांना खिळवून ठेवणारी अविस्मरणीय रेस अनुभवण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. या फेरीत रायडर्सकडून आम्हाला मोठ्या अपेक्षा आहेत.

इदेमित्सु होंडा इंडिया टॅलेंट कप

इदेमित्सु होंडा इंडिया टॅलेंट कप NSF250R मध्ये रेसिंग क्षेत्रात उंची गाठण्याची इच्छा असलेल्या तरुण रायडर्सना चांगला अनुभव मिळतो. या चॅम्पियनशीपमध्ये मोटोथ्री रेसिंगसाठी खास तयार करण्यात आलेल्या होंडा NSF250R मोटरसायकल्स स्पर्धात्मक प्लॅटफॉर्म देतात. हलक्या वजनाची चासिसदणकट इंजिन आणि एयरोडायनॅमिक बॉडीवर्क यांच्या जोरावर NSF250R ट्रॅकवर उत्कृष्ट कामगिरी करतात. रायडर्सचा विकास करणे आणि त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देणे हे या स्पर्धेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. इदेमित्सु होंडा इंडिया टॅलेंट कप NSF250R मुळे व्यावसायिक मोटरसायकल रेसिंगमध्ये प्रवेश करू इच्छिणाऱ्या भारतीय रायडर्सना मार्ग खुला होतो.

 

इदेमित्सु होंडा इंडिया टॅलेंट कप NSF250R च्या दुसऱ्या फेरीमध्ये १४ तरुण रायडर्स मोटोथ्री रेस मशिन - NSF250R वर स्वार होताना दिसतील.

पहिल्या फेरीत कविन क्विंतलरक्षित दवे आणि प्रकाश कामत यांनी आपले असामान्य कौशल्य दाखवतपोडियमवर अनुक्रमे १-२-३ स्थान आणि NSF250R विभागावर वर्चस्व मिळवले. कविन क्विंतल यांनी आपल्या दमदार कामगिरीने पोडियमवर आघाडीचे स्थान मिळवले. प्रभावी रायडिंग कौशल्यधोरणात्मक डावपेच आणि सातत्यपूर्ण वेगाच्या जोरावर त्यांनी या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. रक्षित दवे यांनी आपली गुणवत्ता आणि जिद्द दाखवत दुसरे स्थान मिळवलेतर प्रकाश कामत यांनी तिसरे स्थान मिळवले.

त्यांना श्याम सुंदर (१९ वर्ष)चेन्नईचे थिओपॉल लिएंडर (२२ वर्ष)मल्लपुरमचे मोहसिन पी (२० वर्ष)बेंगळुरूचे एएस जेम्स (२१ वर्ष)आणि सॅम्युएल मार्टिन (२३ वर्ष)आणि बेळगावचे विवेक रोहित कपाडिया(२० वर्ष)मुंबईचे राहीश खत्री (१५ वर्ष)उत्तुरचे सिद्धेश सावंतबेंगळुरूचे हर्षित बोगार (१९ वर्ष)चेन्नईचे श्याम बाबू (१९ वर्ष)आणि हैद्राबादचे बीदानी राजेंद्र (१८ वर्ष)यांनी तोडीस तोड स्पर्धा दिली.

होंडा रेसिंग इंडिया टीम २०२३ इदेमित्सु होंडा इंडिया टॅलेंट कप NSF250R च्या दुसऱ्या फेरीसाठी सज्ज होंडा रेसिंग इंडिया टीम २०२३ इदेमित्सु होंडा इंडिया टॅलेंट कप NSF250R च्या दुसऱ्या फेरीसाठी  सज्ज Reviewed by ANN news network on ७/०७/२०२३ ११:२७:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".