मुंबई : राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी . निवडणूक आयोगाला खोटी माहिती दिल्याप्रकरणी त्यांच्यावर न्यायालयाने खटला चालवण्याचे आदेश दिले आहेत.
सिल्लोड येथील सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपल्ली यांनी २०२१ मध्ये या संदर्भात याचिका दाखल केली होती. अब्दुल सत्तार यांनी यांनी २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाला संपत्तीबाबत खोटी माहिती दिल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. एकच जमीन जी २०१४ रोजी खरेदी केली, त्याच्या किमतीमध्ये २०१९ अधिकची किंमत दाखवण्यात आली आहे. अशाच एकूण ४ ते ५ मालमत्तांसंदर्भात देण्यात आलेल्या माहितीत तफावत आढळून आली आहे.
याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी तपास केला. तेव्हा ही माहिती समोर आली. त्यामुळे सिल्लोड न्यायालयाने या प्रकरणी खटला चालवण्याचे आदेश दिले आहेत. आरोप सिद्ध झाल्यास अब्दुल सत्तार यांची आमदारकी जाईल शिवाय ६ वर्षे निवडणूक लढण्यासही ते अपात्र ठरतील.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: