पिंपरी : गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पवना धरणाच्या पाणीपातळीत १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. धरणात सध्या ५१.३४ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड आणि मावळवासीयांना दिलासा मिळाला आहे.
मावळातील पवना धरणातून; पिंपरी-चिंचवडवासीयांना पाणीपुरवठा केला जातो. गेल्या चार वर्षांपासून पिंपरी-चिंचवडमधील रहिवाशांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, मागील महिना पावसाविना संपला आणि जलसंकटाची शक्यता कायम होती. पावसाची चिन्हे दिसत नसल्याने पिंपरी-चिंचवड महापालिका वाढीव पाणीकपात करण्याच्या तयारीत होती . मात्र आता पवना धरणाच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. पाणीपातळी सध्या ५१.३४ टक्के असून, गेल्या चार दिवसांत १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. भविष्यात मुसळधार पाऊस झाल्यास धरण १०० टक्के भरले जाईल, अशी आशा निर्माण झाली असून, ही नागरिकांसाठी दिलासादायक बाब आहे.
Reviewed by ANN news network
on
७/२१/२०२३ १२:०५:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: