इर्शाळवाडी दुर्घटनेतील बाधितांचे कायमचे पुनर्वसन करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 


खालापूर : बचाव कार्य करणे व सुरक्षित स्थळी बाहेर काढण यास प्राधान्य देण्यात येत आहे. त्यांच्या निवाऱ्याची सध्या तात्पुरती व्यवस्था केली असून नियोजन  झाले आहे.  कायमचं पुनर्वसन करण्यासंदर्भात देखील विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याबरोबर चर्चा केली आहे , असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अगदी सकाळीच दरड कोसळलेल्या इर्शाळवाडीला पोहचले आणि दिवसभर बचाव कार्याला मार्गदर्शन व गती देण्याचे काम करत आहेत  केले.

 त्यांनी सांगितले की , बारा लोकांचा मृत्यू झाल्याचे दिसून येत आहे. या वाडीतील 103 लोकांचे ओळख पटविण्यात आले आहे त्यापैकी 90 लोक सुरक्षित आहेत.  जे जखमी आहेत त्यांच्यावर पनवेल एमजीएम रुग्णालयात उपचार चालू आहेत व मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपये मदत  देण्याचा निर्णय घेणे घेतला आहे.

   बचाव कार्यात येणाऱ्या अडथळ्यांबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, सतत पाऊस होत असल्याने मदत कार्यात अडथळे येत आहेत हेवी मशिनरी व अवजार पोहोचण्यात अडचणी येत आहेत.  दोन हेलिकॉप्टर तैनात केले होते , परंतु ते खराब हवामानामुळे येथे पोहोचू शकलेले नाहीत, असे यावेळी मुख्यमंत्री श्री .शिंदे म्हणाले

 ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन येथे रात्रीपासून उपस्थित असून अधिकारी, रेस्क्यू टीम ही यांच्या संपर्कात रात्रीपासून होतो असे मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी सांगितले . 

ते म्हणाले , बचाव कार्य करताना  स्वतःचे जीव धोक्यात घालून या ठिकाणी काम करत आहेत.  इथे मदत कार्य आणि बचावकार्य अवघड आहे, तरीसुद्धा पाऊस असताना जे लोक ढिगार्‍याखाली अडकले आहेत त्यांना बाहेर सुरक्षित काढणं आणि  सुरक्षित स्थळी ठेवून आणि त्यांची व्यवस्था करण्यात येत आहे असे माहिती देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 

इर्शाळवाडी दुर्घटनेतील बाधितांचे कायमचे पुनर्वसन करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इर्शाळवाडी दुर्घटनेतील बाधितांचे कायमचे पुनर्वसन करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Reviewed by ANN news network on ७/२०/२०२३ ०४:५९:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".