हुजैफा पटेल,नौफील सय्यद यांनी दिली २ लाखांची देणगी
प्रेरणा गावंड
खालापूर : रायगड जिल्हा प्राथमिक शाळा हालखुर्द उर्दू तालुका खालापूर जिल्हा रायगड जिल्हा परिषद शाळा च्या दोन वर्ग खोल्यांचा नूतनीकरण व सुशोभिकरण करण्यात आले .
यामध्ये शाळेचा छप्पर पूर्णपणे दुरुस्त करून नवीन पत्रे टाकण्यात आले . खिडक्या व दरवाजे दुरुस्त करून शाळेला उत्कृष्ट रंगोटी करण्यात आली. सदर शाळेच्या दुरुस्ती व सुशोभीकरण करण्यासाठी हुजैफा पटेल (उद्योजक समाजसेवक),नौफील सय्यद (उद्योजक समाजसेवक) यांच्यातर्फे 2 लाख भरीव अशी मदत करण्यात आली.
सदर कामाचा उद्घाटन व सत्कार समारंभाचा कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये शाळा व्यवस्थापन समिती व शाळेतर्फे हुजैफा पटेल ,नौफील सय्यद , हनीफ करजीकर , अश्रफ दुसते यांना शाल बुके व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.
सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आसीर शेख (उपायुक्त जीएसटी) कार्यक्रमाचे अध्यक्ष शबनम मुल्ला (सरपंच ग्रामपंचायत हाळखुर्द) ,अजीम करजीकर (सदस्य ग्रामपंचायत हाळ खुर्द) , इब्राहिम कर्जीकर (सदस्य ग्रामपंचायत हाळखुर्द ) ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सदस्य केंद्रप्रमुख तसेच पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हुजैफा पटेल नौफील सय्यद यांचा शाळे तर्फे व ग्रामस्थांतर्फे आभार मानण्यात आले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक जलालुद्दीन सांगरे, कय्युम दाखवे श्री अहमद,.शगुफता सय्यद यांनी भरपूर मेहनत घेतली.
Reviewed by ANN news network
on
७/१६/२०२३ ०८:३९:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: