सातारा : सातारा जिल्ह्यातील फ़लटण तालुक्यात एका आदिवासी कातकरी महिलेच्या पतीला खोलीत कोंडून र्तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. या महिलेचे कुटुंब ज्या कोळसा भट्टीवर काम करत होते त्या भट्टीचा मालक बाळू शेख याच्यासह अन्य पाचजणांनी हा बलात्कार केला आहे.
ही महिला मूळची रायगड जिल्ह्यातील असून ती आणि तिचे कुटुंब फ़लटण येथील आरोपीच्या कोळसाभट्टीवर काम करत होते. १८ दिवसांपूर्वी तिच्या पतीला एका खोलीत कोंडून तिच्यावर पाचजणांनी बलात्कार केला. ही महिला आणि तिचे कुटुंब रायगड जिल्ह्यात घरी पोहोचल्यावर तिने आपल्या मामाला घडलेला प्रसंग सांगितला. त्यानंतर हा प्रकार कोकण परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक यांच्या कानावर गेला. त्यांनी तातडीने साता-याच्या जिल्ह्या पोलीस अधिक्षकांना याची माहिती दिली. त्यानंतर वेगाने सूत्रे हलली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून कोळसाभट्टी मालक बाळू शेख याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सातारा पोलीस पुढील तपास करत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: