मराठवाडा : प्रहार अपंग क्रांती आंदोलनाची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल, जिल्हाधिकाऱ्यांना दिले चौकशीचे आदेश...

 


दिलीप शिंदे

सोयगाव  : प्रहार अपंग क्रांती आंदोलन सोयगाव तालुकाध्यक्ष यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह,विरोधी पक्षनेत्यांना दिलेल्या निवेदनाची मुख्यमंत्र्यांनी तात्काळ दखल घेत जिल्हाधिकारी यांनी चौकशीचे आदेश दिल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

        याबाबत सविस्तर माहिती,  नोंदणी व मुद्रांक विभाग,दुय्यम निबंधक श्रेणी-1 सोयगाव येथील कार्यालयात दि. २६ सोमवारी रात्री उशिरा पर्यंत खरेदी नोंदणी सुरू असल्याचा प्रकार दि.२७ मंगळवारी उघडीस आला होता.सर्वसामान्य नागरिकांना वेळेचे बंधन दाखविणाऱ्या दुय्यम निबंधक कार्यालय हे कुणाच्या दबावामुळे रात्री उशिरापर्यंत सुरू होते. रात्री झालेल्या खरेदया कुणाच्या, त्याबाबत कार्यालयाने पाळलेली गुप्तता, यामुळे राजकीय पुढाऱ्यांच्या खरीदया झाल्या असाव्यात अशी चर्चा तालुक्यात रंगली असून जिल्ह्यात हा चर्चेचा विषय ठरला आहे. रात्री झालेल्या खरीदयांची माहिती मिळावी  यासाठी दोन्ही पायाने ७३% दिव्यांग असलेले संदीप इंगळे हे कार्यालयात व्हील चेअर नसल्याने जाऊ शकत नव्हते त्यामुळे त्यांनी त्यांचा सहकारी अनिल लोखंडे (हाताने ५०% दिव्यांग) हा दुय्यम निबंधक श्रेणी-१ सोयगाव येथील कार्यालयात गेला असता अधिकारी मनीष इसाई यांनी अनिल लोखंडे या दिव्यांगास अपशब्द वापरीत मूळ अर्ज घेऊन पोहच देण्यासाठी तब्बल दीड तास कार्यालयात बसवून  दिव्यांगास वेठीस धरणाऱ्या  मनीष इसाई या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी,दि.२६ जून रोजी रात्री झालेल्या खरीदया नोंदणी रद्द करण्यात याव्या अन्यथा दि.१४ ऑगस्ट रोजी तहसील कार्यालसमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा  संदीप इंगळे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, बच्चूभाऊ कडू,विरोधीपक्षनेते, विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते, सह दुय्यम निबंधक औरंगाबाद यांना दि.२८ रोजी दिलेल्या लेखी निवेदनाद्वारे देण्यात आला होता. याची तत्काळ दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांनी चौकशीचे आदेश दिल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

मराठवाडा : प्रहार अपंग क्रांती आंदोलनाची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल, जिल्हाधिकाऱ्यांना दिले चौकशीचे आदेश... मराठवाडा : प्रहार अपंग क्रांती आंदोलनाची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल, जिल्हाधिकाऱ्यांना दिले चौकशीचे आदेश... Reviewed by ANN news network on ७/०३/२०२३ ०९:२२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".