'अनुग्रह' नृत्य कार्यक्रमात गुरूंप्रती कृतज्ञतेचे विलोभनीय दर्शन !

पुणे : गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने कलावर्धिनी संस्थेतर्फे आयोजित  'अनुग्रह 'या भरतनाट्यम नृत्य सादरीकरण कार्यक्रमात  गुरूंप्रती कृतज्ञ भावनेचे दर्शन घडले ! महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी(मयूर कॉलनी, कोथरूड) सभागृहात ३ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून यावेळी कलावर्धिनी ' च्या शिष्य परिवाराने ज्येष्ठ नृत्य गुरु डॉ. सुचेता भिडे- चापेकर यांचा कृतज्ञ भावनेने सत्कार केला.

'वारसा 'आणि 'परंपरा' अशा दोन सत्रात हा कार्यक्रम पार पडला. 'वारसा' मध्ये स्मिता महाजन,रमा कुकनूर,वृषाली चितळे-लेले ,शिल्पा देशमुख, केतकी नेवपूरकर यांचे नृत्य सादरीकरण झाले .

'परंपरा' या सत्रामध्ये ज्येष्ठ नृत्य गुरु डॉ.सुचिता भिडे-चापेकर,अरुंधती पटवर्धन, सागरीका पटवर्धन यांचे नृत्य सादरीकरण झाले.डॉ.सुचिता भिडे-चापेकर,त्यांची कन्या-शिष्या अरुंधती पटवर्धन आणि नात सागरीका पटवर्धन या ३ पिढ्यांतील कलाकारांचे  नृत्य सादरीकरण हे या कार्यक्रमाचे वैशिष्टय ठरले. या सर्व सादरीकरणांना पुणेकर रसिकांनी भरभरुन प्रतिसाद दिला.

   शहाजीराजांच्या मंजूळ पदांनी डॉ. सुचेता भिडे- चापेकर यांनी नृत्य सादरीकरणाची सुरवात केली.नायिकांवरील सोलो ( एकल) नृत्य, ' नृत्य गंगा ' तील काही प्रवेश तसेच ' आओ प्यारे नंदलाला ' ही बंदीश सादर करून  डॉ. सुचेता भिडे- चापेकर यांनी उपस्थितांची मने जिंकली.

त्या आधी    आदी शंकराचार्यांच्या गुरू अष्टकम् रचनेवरील नृत्याने प्रारंभ झाला.   ' परंपरा ' सत्रात  अरूंधती पटवर्धन आणि शिष्यांनी  ' आलारूपी (' अलरू ' ) संरचना सादर केली.  कार्तिकेय स्तुती ' ही रचना सादर करण्यात आली.शिल्पा देशमुख आणि शिष्यांनी  सरस्वती रचना सादर केली.

वृषाली चितळे -लेले,रमा कुकनूर यांनी ' नच सुंदरी करू कोपा ' या नाटयपदातून कृष्ण -रूक्मीणीतील रुसवा  विलोभनीय स्वरूपात सादर केला.' रामनाम बभुव ' श्लोकावर आधारित रचना सादर करण्यात आली.


नृत्य ही सर्वसमावेशक कला : डॉ. सुचेता भिडे- चापेकर

मनोगत व्यक्त करताना डॉ. सुचेता भिडे -चापेकर म्हणाल्या, 'नृत्य ही सर्वसमावेशक कला आहे.आकाशाच्या कॅनव्हासवर रेषा उमटविण्याचे ही कला आहे. सर्व कलांना ही कला सामावून घेते. अभिनयही हालचालीतून केला जातो. ही दृश्य रुपं मला समजत गेली, घरचा पाठींबा मिळाला. सगुण- निर्गुण कल्पना आपल्याकडे सुरेख आहेत. भारतीय तत्वज्ञान या कल्पनांना सामावून घेतात. देवाची  व्यक्तीमत्वे  नृत्यशैलीतून व्यक्त होतात. सर्व कलाकार परफॉर्मर होतील असे नाही, पण,आयुष्यभर पुरणाऱ्या जाणीवा नृत्यकलेतून दिल्या जातात.नृत्य ही संगीत,साहित्य, हस्तमुद्रांची भाषा आहे.ती पुढे जात राहावी.

'अनुग्रह' नृत्य कार्यक्रमात गुरूंप्रती कृतज्ञतेचे विलोभनीय दर्शन !  'अनुग्रह' नृत्य कार्यक्रमात गुरूंप्रती कृतज्ञतेचे विलोभनीय दर्शन ! Reviewed by ANN news network on ७/०३/२०२३ ०९:१८:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".