पुणे : भीमाशंकर-कल्याण या मार्गावर धावणा-या एसटी बसला गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास आंबेगाव तालुक्यातील गिरवली गावाजवळ अपघात झाला. बस स्लिप होऊन सुमारे २५ फ़ूट खोल कोसळली. या बसमध्ये असलेले ३५ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, जिवीतहानी झालेली नाही.
बसच्या चालक आणि वाहकांच्या म्हणण्यानुसार पाऊस सुरू असल्याने बस स्लिप झाली आणि ओढ्यावरील पुलाचे कठडे तोडून खाली कोसळली.
अपघाताची माहिती मिळताच, घोडेगावचे पोलीस निरीक्षक गिरवली गावचे ग्रामस्थ घट्नास्थळी पोहोचले.त्यांनी खाजगी वाहने, रुग्णवाहिका यातून जखमींना रुग्णालयात पोहचवले. जिल्हा प्रशासनाचे अधिकारी अपघातस्थळी दाखल झाले असल्याचे वृत्त आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: