पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील भक्ती शक्ती शिल्प समूहालगतची जागा महापुरुषांची जयंती व सार्वजनिक उपक्रमाकरिता कायमस्वरूपी राखीव ठेवण्यात यावी या मागणीसाठी विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्षाच्या लोकांनी सोमवारी एकत्रित येऊन "मुंडन" आंदोलन करून पीएमआरडीए प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.
यामध्ये सतीश काळे, सचिन काळभोर,रोहिदास शिवणकर, दिगंबर बालुरे, संतोष वाघमारे, रवींद्र कच्छवे या कार्यकर्त्यांनी स्वतःचे मुंडन करून पीएमआरडीए प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले, शिवसेना ठाकरे गट युवराज कोकाटे, नागरी हक्क समिती सुरक्षा समितीचे अध्यक्ष मानव कांबळे, ओबीसी महासंघाचे अण्णा कुदळे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष कविता आल्हाट, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष संजय ससाने भाऊसाहेब आढागळे, देवेंद्र तायडे,आम आदमी पार्टीचे ब्रह्मानंद जाधव, वीर भगतसिंग संस्थेचे नकुल भोईर, नितीन सूर्यवंशी, ज्ञानदेव लोभे, मीरा कदम, सपना कदम, धनाजी यळकर पाटील, गणेश पाटील , रामदेव औशरमल, राजन नायर, प्रशांत चंद्र चंपल, राजू चांदणे सचिन शेट्टी, बाप्पू पोळ अजय कोकाटे, आदी उपस्थित होते.
आंदोलनाचा समारोप झाल्यानंतर श्री महिवाल यांना निवेदन देऊन जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर लोकशाही व सनदशीर मार्गाने उपोषण, रस्ता रोको, जेलभरो प्रसंगी आत्मदहन आंदोलन करण्याची आम्ही मागेपुढे पाहणार नाही. असा इशारा आंदोलकांनी श्री महिवाल यांना दिला. यावर आम्ही येत्या शुक्रवार पर्यंत आमची भूमिका तुम्हाला कळवू असे आश्वासन श्री महिवाल यांनी दिले.
Reviewed by ANN news network
on
६/०५/२०२३ १०:०१:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: