बहुप्रशंसित “खो-खो” हा क्रिडा विषयक चित्रपटाचा अल्ट्रा झकास ओटीटीवर ५ जूनला प्रिमियर

 


मुंबई : मराठी ओटीटी प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या वेगवेगळ्या कन्टेंटने चर्चेत असलेल्या अल्ट्रा झकास ओटीटी प्लॅटफॅार्मवर बहुप्रशंसित मल्याळम भाषेतील ‘खो-खो’ हा चित्रपट मराठी भाषेत प्रिमियरसाठी सज्ज झाला आहे.  ‘खो-खो’ हा २०२१ चा मल्याळम भाषेतील क्रिडा विषयवर आधारित चित्रपट आता जगभरातील प्रेक्षकांसाठी मराठीमध्ये उपलब्ध होणार आहे. 

‘खो-खो’ या चित्रपटाची कथा तिरुअनंतपुरममधील माजी अॅथलीट मारिया फ्रान्सिसभोवती फिरते, जिने काही विशिष्ट परिस्थितींमुळे राष्ट्रीय खो-खो संघात जाण्याची संधी गमावली होती. तिच्या कुटुंबाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी ती नंतर मुलींच्या शाळेत पीटी शिक्षिकेची नोकरी स्वीकारते.

‘खो-खो’ हा खेळ एका प्रतिभावान खेळाडूच्या अत्यंत संबंधित कथेची पार्श्वभूमी बनवते आणि तिच्या इच्छेची ठिणगी हसतमुख आणि मजेदार किशोरवयीन मुलांमध्ये हस्तांतरित करते. मुलींसाठी एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व बनून ती स्वत: तिच्या करिअरमध्ये जे मिळवू शकली नाही ते मिळवण्याचा तिने कसा प्रयत्न केला याचे वर्णन या चित्रपटातून केले आहे. 

राष्ट्रीय पुरस्कार विजेते राहुल रिजी नायर लिखित आणि दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेत्री राजीषा विजयन मुख्य भूमिकेत असून  ममिता बैजू, रंजीत शेखर नायर आदी कलाकार आपल्याला या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. 

अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंटचे एम डी आणि सीईओ सुशीलकुमार अग्रवाल म्हणतात, “आमच्या जगभरातील मराठी प्रेक्षकांसाठी 'खो-खो' मराठीत प्रदर्शित करताना आम्हाला आनंद होत आहे. प्रेक्षकांना त्याच्या मातृभाषेत चित्रपटाचा आनंद घेता यावा म्हणून 'खो-खो' सारख्या चित्रपटाला मराठीत डब करण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून संपूर्ण भारतातील प्रादेशिक भाषिक कंन्टेट एकत्र करून विशेष आकर्षक कथा प्रेक्षकांसाठी प्रदान करण्याच्या हक्काच्या प्लॅटफॅार्मची आम्ही बांधिलकी दर्शवितो.”े

अल्ट्रा झकास विषयी

दोन हजार तासांपेक्षा अधिक तासांचा कन्टेंट उपलब्ध असणाऱ्या ‘अल्ट्रा झकास’वर मराठी भाषेत डब केलेले दाक्षिणात्य आणि हॉलीवूडच्या चित्रपटांबरोबरच, जुने आयकॉनीक मराठी चित्रपट आणि विविध विषयांवरील वेब सीरिज, किड्स अॅनिमेश, वेब-शो असा मनोरंजनाचा खजिना उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी www.ultrajhakaas.com ला भेट द्या आणि तुमच्या कुटुंबासोबत आनंद घ्या ‘अल्ट्रा झकास’वरील एचडी कन्टेंटचा.

बहुप्रशंसित “खो-खो” हा क्रिडा विषयक चित्रपटाचा अल्ट्रा झकास ओटीटीवर ५ जूनला प्रिमियर बहुप्रशंसित “खो-खो” हा क्रिडा विषयक चित्रपटाचा अल्ट्रा झकास ओटीटीवर ५ जूनला प्रिमियर Reviewed by ANN news network on ६/०३/२०२३ ०६:११:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".