पिंपरी : दाखलेबाज गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल जप्त

 


पिंपरी : खुनाच्या गुन्ह्यात जामीनावर सुटलेल्या एका सराईत गुन्हेगारास पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुंडविरोधी पथकाने अटक केली असून त्याच्याकडून एक पिस्तूल आणि २ काडतुसे जप्त केली आहेत. 

गुंडविरोधी पथक २ जून रोजी पुनवळे परिसरात गस्त घालत असताना त्यांना मिळालेल्या माहितीवरून पथकाने उमेश चंद्रकांत केदारी, वय २७ वर्षे, रा. गणेश बेलेरोजा सोसायटी, फलॅट नं. बी/ ५०१, कोयतेवस्ती, पुनावळे, पुणे  याला कोयतेवस्ती चौकात असलेल्या एस.के.वडेवाले या दुकानासमोरून ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे १ गावठी पिस्तूल आणि दोन काडतुसे आढळली, त्याला अटक करून त्याच्या विरोधात रावेत पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक २२८/ २०२३, भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५). महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा नोंद करुन त्याला रावेत पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. रावेत पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ५ जूनपर्यंत पोलीसकोठडी दिली आहे.

या आरोपीवर २०१८ साली कामशेत पोलीसठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे. 

ही कारवाई गुंडविरोधी पथकाचे सहायक निरीक्षक एच.व्ही.माने, अंमलदार विक्रम जगदाळे, नितीन गेंगजे, व रामदास मोहीते यांनी केली.

पिंपरी : दाखलेबाज गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल जप्त पिंपरी : दाखलेबाज गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल जप्त Reviewed by ANN news network on ६/०३/२०२३ ०६:३६:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".