मुंबई : हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचे आज ४ जून रोजी मुंबईतील दादर येथे एका रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. त्या ९४ वर्षांच्या होत्या.
गेले काही दिवस त्या श्वसनाच्या विकाराने आजारी होत्या. त्याकरिता त्यांच्यावर उपचार सुरू होते.
त्यांनी अनेक त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केले. मराठा तितुका मेळवावा, मोलकरीण, बाळा जो जो रे, सांगते ऐका, सासुरवास, वहिनीच्या बांगड्या अशा अनेक मराठी सिनेमांमध्ये काम केले होते. तसेच दीदींनी आये दिन बहार के, कटी पतंग, नाटक, चिराग, संबंध असे त्यांचे काही चित्रपट आणि त्यातील त्यांच्या भूमिका कायम स्मरणात राहतील अशा आहेत. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांचे निधन
Reviewed by ANN news network
on
६/०४/२०२३ ०७:५५:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: