पुणे : रेल्वे परिसर अतिक्रमणमुक्त करण्याच्या प्रयत्नात रेल्वे संरक्षण दलाने (आरपीएफ) शुक्रवारी शिवाजी नगर ते खडकी रेल्वे स्थानकादरम्यान अतिक्रमणविरोधी मोहीम राबवली. या मोहिमेमुळे कोट्यवधी रुपयांच्या रेल्वेच्या जमिनीवर कब्जा केलेल्या सुमारे १५० ते २०० अनधिकृत झोपड्या हटविण्यात आल्या.
वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त, सहायक सुरक्षा आयुक्त आणि रेल्वे संरक्षण दल, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.
या संयुक्त कारवाईत अभियांत्रिकी विभागाचे अधिकारी, गव्हर्नमेंट रेल्वे पोलिस (जीआरपी), आरपीएफ आणि स्थानिक पोलिसांसह 50 पथके आणि 4 जेसीबी मशीनचा वापर करण्यात आला. ही मोहीम 8 तासांहून अधिक काळ चालली.
रेल्वे परिसर अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी भविष्यात अशा प्रकारच्या मोहिमा नियमितपणे राबवल्या जातील, असे रेल्वेकडून सांगण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: