ग्राहकाकडून ऑनलाइन पद्धतीने पैसे न घेता कॅश पैसे देण्यासाठी दमदाटी
प्रेरणा गावंड
पनवेल : परप्रांतीय हातगाडी व्यवसायिकांकडून आर्थिक स्वार्थापोटी मदत कार्य करणाऱ्या गावगुंड व प्रशासनाला जाब कोण विचारणार ..कुठल्याही प्रकारची गैय न बाळगता बेकायदेशीर पद्धतीने मनात येईल त्या ठिकाणी सुरक्षित बाबींचा विचार न करता स्वतःच जागा ठरवून विनापरवाना व्यवसाय करत असल्याचे विचित्र प्रकार हजरोच्या संख्येने पाहायला मिळते.
महापालिका क्षेत्रातील अतिक्रमण मोहीम याकडे लक्ष देणार का असा प्रश्न जनसामान्यांमध्ये उद्भवतो
पनवेल येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात वीज वितरण ट्रांसफार्मर च्या लोखंडी जळीला खेठून विद्युत प्रणालीच्या खालीच
कापडी व प्लास्टिक शेड टाकून कुठल्याही प्रकारची सुरक्षितता न बाळगता बेकायदेशीर पद्धतीने जीवघेणा असा प्रकार राज्य वीज वितरण अधिकारी थांबवणार नसेल तर शॉर्ट सर्किट ने आग लागून किंवा आपत्कालीन परिस्थितीत भविष्यात भयंकर जीवित हानी होण्याची दाट शक्यता निर्माण होते.
विनापरवाना व बेकायदेशीर पद्धतीने अतिक्रमण करून जागा अडवणाऱ्या व्यवसायिकांच्या मनमानी कारभारा मुळे भविष्यात नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होईल त्याला जवाबदार कोण म्हणून सुज्ञता बाळगून बेकायदेशीर नियमबाह्य पध्दतीने व्यवसाय करणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्यांवर कायमस्वरूपी कारवाई करावी अशी मागणी पनवेलकरांकडून सातत्याने होत आहे.
ह्या गंभीर विषयावर अनेक प्रसार माध्यमातून बातमी प्रसिद्ध करण्यात आली असून त्यावर पालिका प्रशासन काय पाऊल उचलते ह्याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: