मावळ : महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना,जड अवजड वाहतूक विभागाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील जनतेच्या न्याय हक्कांसाठी, सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीने महाराष्ट्रभर सुरू असलेल्या अवैध वाहतुकीला आळा घालण्याकरीता अभियान हाती घेतले.
मनसे जड, अवजड वाहतूक विभागाचे अध्यक्ष प्रदीप वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली, मावळ जिल्हा संघटक सुनील गाडेकर व त्यांचे सहकारी काशिनाथ शेंडगे, सैफ मोडक या शिष्टमंडळाने ओव्हरलोड वाहतूक करणा-या वाहनाची चोकशी केली असता वाहन क्षमतेपेक्षा जास्त ओव्हरलोड वाहतूक करत असल्याचे आढळले.
सदर बेकायदेशीर असुरक्षित वाहतूक थांबविण्याचे आवाहन वाहतूक वाहन चालक मालक संघटना व उद्योग समूहाला ह्या घटने नंतर अंतिम चेतावणी देत केले.
वाहनाच्या कागदपत्रांची तपासणीत केली असता क्षमतेपेक्षा २६ ते २७ टन जास्त भार असल्याचे स्पष्ट झाले. सदर हजारो वाहने रोज राज्य भरात नियमितपणे ओव्हरलोड वाहतूक करत असल्याचे चालकाने सांगितले.व त्यावर आमच्या वाहनांवर RTO सुद्धा कारवाई करत नाही असे सांगितले.
एका वाहनावर तब्बल तीन स्टील कॉइल लोड करून जेएनपीटी ते मुरबाड दरम्यान सदर ओव्हरलोड वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे, परंतु सर्वच परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांचे सदर ओव्हरलोड वाहतुकीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याचे मनसे शिष्टमंडळाने अनुभवले.
मनसे जिल्हा संघटक, सुनील गाडेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी सदर ओव्हरलोड वाहतुक करणाऱ्या वाहनांचा चित्रीकरण व फोटोग्राफी करून पनवेल RTO कार्यालयाला निर्देशनात आणले .
अशा ओव्हरलोड वाहनांमुळे महसूल चुकवत रस्त्यावर जीव घेणा असुरक्षित व बेकायदेशीर प्रकार घडत आहे .
महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना, जड अवजड वाहतूक विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे परिवहन आयुक्त तसेच संबंधित प्रादेशिक व उपप्रादेशिक अधिकाऱ्यांना वारंवार सदर ओव्हरलोड वाहतुकीची माहिती देऊन सुद्धा अशा ओव्हरलोड माफियांवर एकदा ही कारवाई होणार नसेल तर महाराष्ट्रातील जनतेच्या संरक्षणाकरिता महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना रस्त्यावर उतरल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे आव्हान मनसे सैनिकांनी माध्यमांना कळवले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: