अध्यक्षपदी अमित उपानेकर, उपाध्यक्षपदी मंदार आपटे, सचिव पदी प्रमोद येलवे मार्गदर्शक म्हणून किरण तायडे यांची नियुक्ती
मंदार आपटे
खेड : रविवार दिनांक 4 रोजी खेड तालुक्यातील महा ई सेवा केंद्र चालवित असणारया सर्व संचालक यांची सभा हॉटेल सोरभ येथे आयोजित करण्यात आली होती. या सभेला अमित उपानेकर,किरण तायडे,सौरभ बुटाला,मंदार आपटे,समीर वानखेडे,प्रमोद येलवे,दुर्वास बेडंखळे, विक्रम सनगरे, श्री चोचे यांसह अनेकजण उपस्थित होते.
सदर सभेत महा ई सेवा केंद्र संचालक यांची संघटना स्थापन करण्यात आली.संघटनेचे अध्यक्ष म्हणून अमित उपानेकर,उपाध्यक्ष मंदार आपटे,सरचिटणीस प्रमोद येलवे, खजिनदारपदी सौरभ बुटाला,सह.खजिनदार विक्रम सनगरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.तसेच ज्येष्ठ सल्लागार म्हणून किरण तायडे यांची निवड करण्यात आली.
सर्व नवनिर्वाचित कार्यकारिणीचे अध्यक्ष यांनी अभिनंदन केले. यावेळी उपसथितांन मार्गदर्शन करताना किरण तायडे म्हणाले की सर्वांनी एकत्र रहाणे ही काळजी गरज आहे . यानंतर विक्रम सनगरे यांनी आभार प्रदर्शन केले
Reviewed by ANN news network
on
६/०४/२०२३ ०९:०७:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: