दिलीप शिंदे
सोयगाव : हळदा घाटाला लागून असलेल्या वेताळवाडी किल्ल्याजवळील इच्छापूर्ती गणपती मंदिर येथे दि.०४ रविवारी जय बाबाजी भक्त परिवाराकडून महाश्रमदान करण्यात आले.
श्री गणेशाचे पूजन करून आरती करण्यात आली. त्यानंतर इच्छापूर्ती गणपती मंदिर परिसरात महाश्रमदानास सुरुवात करण्यात आली. यावेळी ऐतिहासिक श्री क्षेत्र रुद्रेश्वर लेणी परिसर, वेताळवाडी किल्ला परिसरात प्लास्टिक,पाण्याच्या बाटल्या,कचरा आदी स्वच्छता करण्यात आली.
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील जय बाबाजी भक्त परिवाराचे दीडशे पुरुष व तीस महिला तर सोयगाव शहरातील जय बाबाजी भक्त परिवाराचे बापू मानकर, श्याम कोकाटे, अण्णाभाऊ शेलकर,दुर्गादास केनेकर, गोपाल बडगुजर, भारत हिरे, निलेश नागपुरे, संतोष खलसे, शंकर शिरसाट, संभाजी बावस्कर, श्याम आगे, संजय जाधव, ज्ञानेश्वर शिंदे, देवेंद्र पंडित, रमेश शेलकर, सुरेश फ़ुसे, रवींद्र फ़ुसे, शंकर राऊत, सुनील मानकर, भागवत आगे, कृष्णा शेलकर आदींनी या महा श्रमदानात भाग घेतला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: