कोल्हापूरात इंटरनेट सेवा बंद करण्याचे आदेश

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या दिवशी काहींनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याच्या घटनेनंतर आज ७ जून रोजी  कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. पोलिसांनी अखेर या मोर्चावर लाठीमार केला.  वातावरण अधिक बिघडू नये म्हणून शहरातील दूरसंचार कंपन्यांना इंटरनेट सेवा बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

शांतता राखण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सगळ्यांचे सहकार्य आवश्यक आहे. राज्य सरकार सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेणारे सरकार आहे. कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम गृह विभागाचे आहे. मी संबंधित अधिकाऱ्यांशी वैयक्तिकरित्या बोलतोय, ते माझ्या संपर्कात आहेत. गृहमंत्रीही स्वतः अधिकाऱ्यांशी बोलत आहेत. कुणीही कायदा हातात घेऊ नये. कायदा हातात घेणाऱ्याला पाठिशी घातले जाणार नाही,' असा इशारा मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.

उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना परिस्थिती त्वरीत नियंत्रणात आणण्याचे निर्देश दिले आहेत. यानंतर पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. कोल्हापुरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे कोल्हापुरचे जिल्हाधिकाऱी राहुल रेखावार यांनी म्हटले आहे.  

कोल्हापूरात इंटरनेट सेवा बंद करण्याचे आदेश कोल्हापूरात इंटरनेट सेवा बंद करण्याचे आदेश Reviewed by ANN news network on ६/०७/२०२३ ०४:२६:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".