कोकण : केंद्र शासनाच्या पथकाने केली ठाणे जिल्ह्यातील जलशक्ती अभियानाच्या कामांची पाहणी

 


ठाणे :  केंद्र शासनाच्या जलशक्ती अभियान -कॅच दी रेन अंतर्गत जिल्ह्यातील विविध ठिकाणी करण्यात आलेल्या जलसंधारणाच्या कामांची पाहणी केंद्र शासनाच्या निती आयोगाच्या सदस्य तथा या अभियानाच्या नोडल अधिकारी जागृती सिंगला यांनी आज केली. 

केंद्र शासनाच्या जलशक्ती अभियानाच्या अंमलबजावणीची माहिती घेण्यासाठी निती आयोगाच्या सदस्या तथा नोडल अधिकारी श्रीमती सिंगला या ठाणे जिल्हा दौऱ्यावर आल्या होत्या. यासंदर्भात त्यांनी काल जिल्ह्यातील विविध अंमलबजावणी यंत्रणेची आढावा बैठक घेतली. आज त्यांनी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांसमवेत भिवंडी तालुक्यातील कोनगाव, खळिंग, कोशिंबे गावांतील विविध कामांची पाहणी केली.  

जिल्हा परिषदेचे लघु पाटबंधारे विभागाकडून अमृत सरोवर अंतर्गत करण्यात आलेल्या गाळ काढणे, बंधारे इत्यादी कामांचा तसेच ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत आदिवासी विकास कार्यक्रम अंतर्गत करण्यात आलेल्या डीप ऍक्वेफेर (खोल भूस्तर) पुर्नभरण कामांची पाहणी केली. तसेच ग्रामीण पाणी पुरवठा विभागा मार्फत राबविण्यात आलेल्या बोअरवेलद्वारे छतावरील पावसाचे पाणी संकलन (Rooftop Rain Water collection (recharge) through bore well with auto clean centrifugal force operated Filter) या योजनेची त्यांनी विशेष प्रशंसा केली.  अशा प्रकारची जास्तीत जास्त कामे घेऊन भूजलस्तर वाढविण्यात यावे, अशा सूचना केल्या. या योजने बाबत पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अर्जुन गोळे व उप अभियंता (यांत्रिकी) संजय सुकटे यांनी माहिती दिली. 

सद्यःस्थितीत या योजनेची 25 कामे पूर्ण झाली असून 13 कामे प्रगतीत असल्याचे सांगितले. यापुढील राबविणेत येणाऱ्या जिल्हा परिषद शाळेतील लघु नळ योजनेमध्ये या योजनेचा समाविष्ट करुन भुजलाची पातळी वाढविण्याचा मुख्य कार्यकारी अधिकारी  मनुज जिंदल यांचा मानस असल्याचे सांगितले.

कोकण : केंद्र शासनाच्या पथकाने केली ठाणे जिल्ह्यातील जलशक्ती अभियानाच्या कामांची पाहणी कोकण : केंद्र शासनाच्या पथकाने केली ठाणे जिल्ह्यातील जलशक्ती अभियानाच्या कामांची पाहणी Reviewed by ANN news network on ६/०१/२०२३ ०८:३४:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".