पुणे : पुणे शहरात गुरुवारी सायंकाळी काही भागात पावसाने हजेरी लावली. यावेळी बाणेर, बावधन व इतर लगतच्या भागात गारपीट झाली. हवामान खात्याने इशारा दिला आहे की, “पालघर, ठाणे, पुणे जिल्ह्यांतील काही ठिकाणी गडगडाटी वादळ आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडतील. ३०-४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. पुढील ३ ते ४ तासात पालघर, ठाणे, पुणे, सातारा, सांगली जिल्ह्यात घराबाहेर पडताना खबरदारी घ्यावी.”
नागरिकांना या कालावधीत सुरक्षित राहण्याचे आणि झाडे पडण्याची शक्यता असल्याने झाडे, होर्डिंगपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुणे महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार शहरात 25 झाडे पडण्याच्या घटना घडल्या.
येरवडा येथे एका घरावर झाड कोसळले आणि मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पडलेली झाडे हटविण्यासाठी अग्निशमन दल दलाची आठ पथके काम करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: