पिंपरी : रहाटणी पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन रस्ता खूप खराब झाला असून संपूर्ण रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी पालिकेचे माजी विरोधीपक्ष नेता नाना काटे यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.
या संदर्भात आयुक्तांना दिलेल्या निवेदनात नाना काटे म्हणतात; प्रभाग क्र २८ रहाटणी पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन रस्ता हा विविध खोदकामामुळे खूप खराब झाला असून या रस्त्यावर खूप खड्डे पडलेले असून रस्ता खिळखिळीत झाला आहे या खड्डेमय रस्त्यामुळे वारंवार छोटे मोठे अपघात होत असतात, आपल्या महानगरपालिकेतर्फे या रस्त्याची वारंवार तात्पुरत्या स्वरुपात डागडुजी केली जाते परंतु पुन्हा काही कामासाठी रस्ता खोदला जातो व रस्त्याची परिस्तिथी जैसे थे होते, संपूर्ण पिंपळे सौदागर मधील मुख्य रस्ते हे सिमेंट कोण्क्रीटचे झाले असून हा रस्ता आजून शासकीय निविदेत अडकला आहे, त्यामुळे लोकप्रतिनिधी या नात्याने परिसरातील नागरिक हा रस्ता कधी होणार किवा याचे डांबरीकारण कधी होणार या नागरिकांच्या प्रश्नाच्या रोषास आम्हाला सामोरे जावे लागत आहे. मुळात हा रस्ता कोणत्या विभागाने करायचा या सरकारी प्रशासन निर्णयात या रस्त्याचे काम रखडले आहे, तसेच या रस्त्या संदर्भात नुकत्याच झालेल्या बैठकीत कळाले कि या रस्त्याचे काम २०२४ ला सुरु करणार आहेत मग या रस्त्यावरील खड्यामुळे मोठा अपघात झाल्यास त्यास जबाबदार कोण..? आयुक्त साहेब हा कुणाल आयकॉन रस्ता खूप रहदारीचा व वर्दळीचा आहे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात निवासी सोसायट्या, शाळा, व्यावसायिक दुकाने आहेत त्यामुळे हा रस्ता खूप महत्वाचा आहे, पावसाळा काही दिवसांवर आला असून शाळा देखील चालू होणार आहेत.
तरी आपणास विनंती की वरील गोष्टींचा विचार करता संपूर्ण कुणाल आयकॉन रस्त्यावर खूप प्रमाणत खड्डे पडलेले असून मोठा अपघात होण्याची शक्यता आहे, होणारा अपघात टाळण्यासाठी रस्त्याचे काम सुरु होईल तेव्हा होईल परंतु सद्य विचार करता या रस्त्याची तात्पुरत्या स्वरुपात डागडुजी न करता त्वरित संपूर्ण रस्त्याचे डांबरीकारण करण्यात यावे
Pimpri: Complete the construction of Kunalaicon Road: Nana Kate.
Pimpri: The road leading to Kunal Icon in Rahatani Pimpale Saudagar has become extremely damaged, with numerous potholes and uneven surfaces. The former opposition leader of the municipality, Nana Kate, has submitted a request to the commissioner, Shekhar Singh, to repair the entire road.
According to the request submitted to the commissioner, the road in Prabhag No. 28 in Rahatani Pimpale Saudagar has become severely damaged due to various excavation works. The road has numerous potholes and has become extremely uneven, leading to frequent accidents. Although the municipal corporation has attempted to repair the road, it has been dug up again for further work. The main road in Pimpale Saudagar has been converted to concrete, but this particular road has been left out of the government's bidding process. This has left citizens wondering when this road will be repaired and made safe for travel.
The responsibility for repairing this road lies with the government administration, but it remains unclear which department will take charge. In a recent meeting, it was revealed that the work on this road will begin in 2024. However, if a major accident were to occur due to the current state of the road, who would be held accountable?
Commissioner Shekhar Singh has acknowledged the importance of this road, as it is home to several residential societies, schools, and businesses. With the monsoon season approaching, it is imperative that this road is repaired before any accidents occur.
We urge the authorities to take immediate action and repair the entire road to ensure the safety of citizens.
Reviewed by ANN news network
on
६/०६/२०२३ ०५:२८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: