मुंबई : मुंबई ते गोवा वंदे भारत रेल्वेचे लोकार्पण उद्या ०३ जून रोजी होणार होते. तथापि नुकत्याच ओडिशा येथे कोरोमंडल एक्सप्रेसला झालेल्या अपघातामुळे कार्यक्रम रद्द करण्यात आला असल्याचे वृत्त आहे.
चेन्नई हावडा कोरोमंडल एक्स्प्रेस आणि एक मालगाडी यांच्यात सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ओडिशातील बहनगा स्टेशनजवळ अपघात झाला असून या अपघातात सुमारे ५० प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भिती व्यक्त केली जात आहे. तर, जखमींचा आकडा २०० च्या आसपास असल्याचे समजते.
या अपघातानंतर राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यासह अनेक नेत्यांनी दु:ख व्यक्त केले आहे. या दु:खद घटनेमुळे मुंबई ते गोवा वंदे भारत रेल्वेचे लोकार्पण पुढे ढकलण्यात आले आहे.
मुंबई ते गोवा वंदे भारत रेल्वेचे लोकार्पण रद्द!
Reviewed by ANN news network
on
६/०२/२०२३ ११:१४:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: