पेण : मुंबई गोवा महामार्गावर पेण एच. पी. पेट्रोल पंपासमोरील ब्रिजवर ३१ मे रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास खेड, जि. रत्नागिरी येथून मुंबईकडे जाणा-या मारुती इको कार MH 43 AJ 0902 ला MH 43 Y 1412 क्रमांकाच्या सिमेंट मिक्सर ट्रकने मागून जोरदार धडक दिली. या अपघातात इको कारमधील सातजण गंभीर जखमी झाले आहेत.
दीपक दत्ताराम उतेकर (इको चालक) वय ३३ (रा.खेड तुलसी),प्रणाली विश्वास सावंत वय ४५ (रा.सांताक्रूझ),नम्रता प्रशांत कांबळे वय २९ (रा.करंजाडे पनवेल),वैशाली सुहास शिगवण वय 35(रा.सांताक्रूझ),ऋषभ असीम अधिकारी वय १० (रा.नालासोपारा),वनिता वसंत शिगवण वय ६० (रा.सांताक्रूझ),आरोही सुहास शिगवण वय १० (रा.सांताक्रूझ) अशी जखमींची नावे आहेत.
अपघात झाल्याचे कळताच कल्पेश ठाकूर यांनी जखमींना आपल्या रुग्णवाहिकेतून तात्काळ पेण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.तसेच पुढील उपचारासाठी पनवेल एम. जी. एम. रुग्णालय येथे हलविण्यात आले.
या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. पेण वाहतूक पोलीसांनी घटनास्थळी जाऊन दोन्ही वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: