कोल्हापुरात सोशल मीडियावरील स्टेटसमुळे वातावरण तापले! पोलिसांचा लाठीचार्ज !!

 

कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटनांचं आंदोलन चिघळलं; पोलिसांचा आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज, पोलिसांनी शांतता राखण्याचे केले आवाहन

कोल्हापूर : कोल्हापुरात औरंगजेबाच्या उदात्तीकरणावरून शहरात  वातावरण तापले आहे. संतप्त जमाव रस्त्यावर उतरला असून जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे.

कोल्हापुरात काही युवकांनी राष्ट्रपुरुषांचा अवमान करणारे वादग्रस्त स्टेटस सोशल मीडियावर ठेवले होते.या प्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांनी आज, बुधवारी (दि. ७) कोल्हापूर शहर बंदची हाक दिली होती. त्यामुळे  सकाळपासूनच शहरातील सर्व दुकाने बंद होती. सकाळी दहापासून हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी चौकात गर्दी केली. आक्षेपार्ह स्टेटस ठेवून राष्ट्रपुरुषांच्या बदनामीचे मेसेज व्हायरल करणा-यांवर कडक कारवाईची मागणी केली. मात्र, कारवाईचे ठोस  आश्वासन न मिळाल्याने संतप्त जमाव रस्त्यावर उतरला. दोन गट आमने-सामने आले. शहरातील दसरा चौक टाऊन हॉल आणि लक्ष्मीपुरी परिसरात दगडफेक झाल्याचे समजते.




कोल्हापूर
 : कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. औरंगजेबाच्या फोटोवरून शहरात दोन गटांमधील वाद विकोपाला गेला आहे. हिंदुत्ववादी संघटनेतील व्यक्ती मोर्चा काढत रस्त्यावर उतरले आहेत. मोठ्या संख्येने जमाव रस्त्यावर उतरल्याने आंदोलन चिघळलं आहे. अशात जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

राष्ट्रपुरुषांचा अवमान करणा-या सोशल मीडियावरील स्टेटसमुळे कोल्हापूर शहरात तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान, कारवाईचे ठोस आश्वासन न मिळाल्याने संतप्त जमाव रस्त्यावर उतरलाय. रस्त्यावर उतरत जमावाने दगडफेक देखील केली आहे. त्यामुळे आंदोलन मोठ्या प्रमाणावर चिघळले आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याने जमाव पांगवण्यासाठी आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला आहे.

कोल्हापुरात काही युवकांनी वादग्रस्त स्टेटस ठेवले. त्यामुळे तणाव निर्माण झाला. त्यातून दोन गट आमने-सामने आले. शहरातील दसरा चौक टाऊन हॉल आणि लक्ष्मीपुरी परिसरात दगडफेक झाली.  परिणामी पाेलिसांची फ़ौज घटनास्थळी दाखल झाली. मात्र परिस्थिती चिघळली त्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज करण्यास सुरुवात केली.

पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी हिंदुत्ववादी संघटनांच्या नेत्यांना चर्चेसाठी  बोलवले असून, सध्या  बैठक सुरू आहे. पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.



कोल्हापुरात सोशल मीडियावरील स्टेटसमुळे वातावरण तापले! पोलिसांचा लाठीचार्ज !! कोल्हापुरात सोशल मीडियावरील स्टेटसमुळे  वातावरण तापले! पोलिसांचा लाठीचार्ज !! Reviewed by ANN news network on ६/०७/२०२३ ०२:२४:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".