चक्रीवादळामुळे मान्सून १० दिवस लांबणीवर

 


पुणे  : अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रावात सदृष्य स्थितीमुळे राज्यात नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन १० दिवस लांबण्याची शक्यता निर्माण झाली  आहे. 

प्राथमिक अंदाजानुसार आता पाऊस जूनच्या दुस-या आठवड्यात राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे. मात्र, राज्यात आज पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, यवतमाळ, वर्धा, अमरावती, नागपूर, वाशिम, हिंगोली, नांदेड आणि भंडारा या जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता हवामानखात्याने वर्तविली आहे.

या आठवड्यात पाऊस केरळमध्ये आणि १४ जूनपर्यंत राज्यात येण्याची शक्यता आहे. १६ ते २२ जूनपर्यंत राज्यात सर्वत्र पावसाळा सुरू होईल.


चक्रीवादळामुळे मान्सून १० दिवस लांबणीवर चक्रीवादळामुळे मान्सून १० दिवस लांबणीवर Reviewed by ANN news network on ६/०६/२०२३ ११:४९:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".