पुणे : मुंबई बंगळुरू महामार्गावर नऱ्हे येथील सेल्फी पॉइंटजवळ शुक्रवारी एका कंटेनरने कारला मागून धडक दिल्याने कारचा चुराडा झाला. सुदैवाने या अपघातात प्राणहानी झालेली नाही. अपघातानंतर कंटेनरचालक घटनास्थळावरून पसार झाला.
अपघातानंतर वाहतूक कोंडी झाली. पोलिसांनी घटनास्थळी येत कार आणि कंटेनर बाजूस केला. त्यानंतर बाहतूक सुरळीत केली.
दोन दिवसांपूर्वीच या परिसरात कंटेनर आणि ट्रकचा अपघात झाला होता. कात्रज नवा बोगदा ते नवले पूल, वडगाव पूल हा मार्ग अपघातप्रवण बनला असल्याच्या वदंतेवर या मुळे पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.
नऱ्हे सेल्फी पॉइंटनजिक कंटेनरची कारला धडक
Reviewed by ANN news network
on
५/०५/२०२३ ०६:१३:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: