किशोर आवारेंची हत्या सुपारी घेऊन केली?

 


पिंपरी : किशोर आवारे हत्याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींनी आवारे यांची हत्या सुपारी घेऊन   केल्याची कबुली पोलिसांकडे दिली असल्याचे वृत्त आहे. ही सुपारी गौरव खळदे याने दिली अशीही कबुली आरोपींनी दिली असल्याने त्याला पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली असल्याचे समजते.

गौरव हा माजी नगरसेवक चंद्रभान खळदे यांचा मुलगा असून काही कालावधीपूर्वी  ेचंद्रभान खळदे आणि किशोर आवारे यांच्यात जुन्या नगरपरिषद इमारतीच्या आवारात वाद झाला होता. त्यावेळी आवारे यांनी चंद्रभान खळदे यांच्या कानशिलात लगावली होती. या रागातून खळदे यांचा मुलगा गौरव याने आरोपींना किशोर आवारे यांच्या हत्येची सुपारी दिली असल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले आहे. मात्र, पोलीस या जबानीवर विसंबून राहण्यास तयार नाहीत. आरोपी दिशाभूल करून तपास भरकटविण्याचा प्रयत्न करत आहेत की काय याची चाचपणी पोलीस करत आहेत.

आवारे यांची हत्या केल्यानंतर आरोपी कारने पसार होऊन कर्जत येथे जाऊन तेथील एका फ़ार्महाऊसमध्ये दडून बसणार होते. मात्र, पिस्तुलाच्या फ़ायरिंगचा आवाज झाल्याने आजुबाजूस असणारे लोक जमा होऊ लागल्याने आरोपी तेथून धावत पसार झाले. आणि काही अंतरावर त्यांनी  अन्य दुचाकीचालकांच्या दुचाकी हिसकावून पळ काढला असल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. मात्र, पोलीस या कबुलीवर विसंबून न राहता सखोल तपास करण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत.


किशोर आवारेंची हत्या सुपारी घेऊन केली? किशोर आवारेंची हत्या सुपारी घेऊन केली? Reviewed by ANN news network on ५/१४/२०२३ १२:४६:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".