दापोली : दापोलीतील हरहुन्नरी व्यक्तिमत्व अशोकराव सावंत यांचे निधन झाले. ते डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठातून अधिक्षक पदावरून ते निवृत्त झाले होते. कर्तव्यदक्ष प्रशासक, अप्रतिम सौंदर्यदृष्टी असलेला कलावंत, उत्कृष्ट क्रीडापटू आणि कुटुंबवत्सल गृहस्थ अशी त्यांची ओळख होती.
गणेशोत्सवाच्या काळात त्यांच्या घरातील गणपतीची आरास पाहण्यासाठी लोक येत असत. शेगावच्या श्री गजानन महाराजांवर त्यांची नि:सीम श्रद्धा होती. गिम्हवणे येथील श्री गजानन महाराज समाज मंदिर आणि दापोलीतील ानेक संस्थांच्या विकासात त्यांचे अमूल्य योगदान आहे.
कोकण : अशोकराव सावंत यांचे निधन
Reviewed by ANN news network
on
५/२१/२०२३ ०४:०३:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
५/२१/२०२३ ०४:०३:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: