ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महान योद्धे, वीर महापराक्रमी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. ठाणे येथील निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमास तहसीलदार युवराज बांगर यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
मेवाड नरेश महाराणा प्रताप हे शूर, साहसी आणि पराक्रमी राजे होते. त्यांनी मुघल साम्राज्याला रोखण्यासाठी पराक्रमाची शर्थ केली होती. महाराणा प्रताप हे एक कुशल संघटक, वीर योद्धा व महान राजा म्हणून ओळखले जात. अशा या महान राजाला अभिवादन अशा शब्दांत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी अभिवादन केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महाराणा प्रताप यांना जयंतीनिमित्त अभिवादन
Reviewed by ANN news network
on
५/२२/२०२३ ०१:०६:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
५/२२/२०२३ ०१:०६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: