पुणे : येथील फ़िल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये शनिवारी ’द केरला स्टोरी’ या चित्रपटाचा शो आयोजित करण्यात आला होता. या वेळी दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांच्याशी गप्पा मारण्याचा कार्यक्रम देखील होता, त्यासाठी अभिनेत्री अदा शर्मा आणि निर्माता विपुल शाह हे ही उपस्थित होते. परंतु यावेळी डाव्या विचारसरणीच्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया मधील विद्यार्थ्यांनी शो दरम्यान जोरदार गोंधळ घातला.
शो पाहण्यासाठी आलेले नागरिक आणि आंदोलक यांच्यात एकमेकांविरुद्ध जोरदार घोषणाबाजी झाली. या वेळी गोंधळ होणार याचा अंदाज पोलिसांना आधीच आला असल्याने पोलीस सावध होते. त्यांनी कुशलतेने परिस्थिती हाताळली. दोन्ही गट एकमेकांना भिडणार नाहीत याची पुरेपूर काळजी घेतली.
मिळालेल्या माहितीनुसार शो सुरू होताच, फ़िल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया मधील अंदाजे 25 ते 30 विद्यार्थी सभागृहाबाहेर जमले आणि त्यांनी जोरदार निषेध सुरू केला. चित्रपटाच्या विरोधात घोषणाबाजी करत आणि एफटीआयआयच्या आवारात सिनेमाविरोधी स्टिकर्स चिकटवून, त्यांनी सार्वजनिक शांतताभंग करण्याचा प्रयत्न केला.
उपस्थित नागरिकांनी आंदोलकांच्या घोषणांना प्रत्युत्तर देताना, “भारत माता की जय”, “छत्रपती शिवाजी महाराज की जय”, “जय भवानी जय शिवाजी” आणि “वंदे मातरम” अशी घोषणाबाजी केली. पोलिसांनी काळजी घेतल्यामुळे गंभीर पेचप्रसंग टळला.
विशेष म्हणजे या परिस्थितीतही दिग्दर्शक सुदिप्तो सेन आणि निर्माते विपुल शाह यांनी आंदोलक विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी संस्थेला भेट दिली, विद्यार्थ्यांच्या समस्या किंवा शंकांचे निराकरण करण्यासाठी संवाद सुरू केला.
Reviewed by ANN news network
on
५/२२/२०२३ ०२:१४:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: