पुणे : समाजकल्याण खात्याकडून मिळणा-या शिष्यवृत्तीच्या रकमेतून आपले शिक्षण पूर्ण करू पाहणा-या विद्यार्थ्यां समोर मोठे संकट उभे राहिले आहे. पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपचा दुसरा हप्ता जमा न झाल्याने महाविद्यालये विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज दाखल करून घेण्यास टाळाटाळ करत आहेत.
संपूर्ण शुल्क भरा तरच परीक्षा अर्ज घेऊ अशी भूमिका काही महाविद्यालये घेत आहेत. अचानक एवढे पैसे कुठून भरायचे असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. महाविद्यालये विद्यार्थ्यांना आर्थिक व मानसिक त्रास देत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. समाजकल्याण विभागाने महाविद्यालयाला सांगून देखील महाविद्यालये दाद देत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप तात्काळ जमा करावी यासाठी युवक क्रांती दलाच्या वतीने आज समाजकल्याण विभागास निवेदन देण्यात आले. यावेळी युवक क्रांती दलाचे पुणे शहर अध्यक्ष सचिन पांडुळे, कार्यकारिणी सदस्य अजय नेमाणे व विद्यार्थी उपस्थित होते.
Reviewed by ANN news network
on
५/०८/२०२३ ०४:२९:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: