नॅशनल अँटी क्राईम अँड ह्यूमन राईट्स ऑफ इंडियाची बैठक

 


प्रेरणा गावंड

मुंबई :  आर एम एम एस वडाळा मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या नॅशनल अँटी क्राईम अँड ह्यूमन राईट्स ऑफ इंडिया  महाराष्ट्र राज्याच्या  समितीत संघटनात्मक बदल  करण्याच्या संदर्भात  बैठक आयोजित करण्यात आली होती.

महाराष्ट्र राज्य कमिटी पदावरून सुनील जोग यांना निष्कासित करून  सुनील गाडेकर यांची नवी मुंबई अध्यक्ष पदावरून प्रदेश सरचिटणीस पदावर नियुक्ती झाली. तसेच  महिला सेल कार्याध्यक्ष डॉ.साक्षी भोईटे, सुगंधा सोंडे महिला सेल चेअरमेन, शिल्पा रणदिवे  नवी मुंबई  महिला सेल अध्यक्ष अश्या विविध पदावर संघटनात्मक नियुक्ती  जॉन एस. किम जे. राष्ट्रीय संस्थापक व अध्यक्ष यांच्या आदेशानुसार  करण्यात आली.

ह्यावेळी बैठकीत पीटरसन जे. राष्ट्रीय उपाध्यक्ष, सविता गोंड राष्ट्रीय सहसचिव, रमाकांत साळवे महाराष्ट्र राज्य चैअरमेन, जोसेफ़ झेवियर महाराष्ट्र राज्य अध्यक्ष,  निलेश सकपाळ अध्यक्ष को ऒपरेटिव्ह विभाग महाराष्ट्र कमिटी सदस्य मान्यवर उपस्थितीत होते.

राष्ट्रीय आणि महाराष्ट्र राज्य समिती सदस्यांनी नवीन सदस्यांना संघटना आणि भारताचे मूलभूत मानवी हक्क समजावून त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

 तसेच क्राईम नेव्हर पेस ही संकल्पना   सुनील गाडेकर प्रदेश सरचिटणीस व  पनवेल शहर उपाध्यक्षा  वैशाली चंदनश्वी यांच्या देखरेखीखाली मांडण्यात आली.

इच्छुक उमेदवारांनी कृपया www.nachrworldwide.in ला भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले.

नॅशनल अँटी क्राईम अँड ह्यूमन राईट्स ऑफ इंडियाची बैठक नॅशनल अँटी क्राईम अँड ह्यूमन राईट्स ऑफ इंडियाची बैठक Reviewed by ANN news network on ५/०८/२०२३ ०४:०७:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".