मुंबई : दापोली तालुक्यातील कर्दे, मुरूड येथील माजीमंत्री अनिल परब यांच्या साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीने कोर्टात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.
हे आरोपपत्र अनिल परब, सदानंद कदम आणि जयराम देशपांडे यांच्याविरोधात दाखल करण्यात आले आहे.
साई रिसॉर्टच्या प्रकरणात मनी लॉन्ड्रीग झाल्याचे ईडीचे म्हणणे आहे. याप्रकरणी परब यांचे मित्र आणि व्यावसायिक भागीदार सदानंद कदम आणि दापोलीचे तत्कालिन प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांना या पूर्वी अटक करण्यात आली आहे. खुद्द परब यांचीसुद्धा ईडीने चार ते पाच वेळा चौकशी केली आहे. सदानंद कदम यांच्या अटकेनंतर परब यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असेपर्यंत परब यांना अटक करू नये,असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे. विशेष पीएमएलए कोर्टात ९ मे रोजी सुनावणी आहे. यावेळी सर्व आरोपीना कोर्टात हजर केले जाणार आहे.
Reviewed by ANN news network
on
५/०८/२०२३ १०:५३:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: