भाकित खरे ठरले!, कर्नाटक निकालाबाबत ज्योतिषी सिद्धेश्वर मारटकर यांचा दावा

पुणे : कर्नाटक निकालाबाबत भाकित खरे ठेवल्याचा   असा दावा ज्योतिष अभ्यासक सिद्धेश्वर मारटकर यांनी आज पुण्यात पत्रकाद्वारे केला आहे. 'ज्योतिष ज्ञान' या ज्योतिषाला वाहिलेले मासिक आहे .  सिद्धेश्वर मारटकर हे या मासिकाचे संपादक आहेत.  'ज्योतिष ज्ञान मासिक अंकातील जानेवारी २०२२ ते सप्टेंबर २०२२ या आवृत्तीमध्ये त्यांनी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत तसेच 2022 सालच्या दिवाळी अंकामध्ये  कर्नाटक विधानसभा निवडणुकीबाबत  भाकीत वर्तवले होते . कर्नाटक मध्ये सत्ताधारी पक्षाला प्रतिकूल काळ असून सत्तांतर होईल,असे निःसंदिग्ध पणे त्यांनी सांगितले होते . 

' विद्यमान सरकारचा काळ आला होता मात्र वेळ आली नव्हती. न्यायालयाचा निकाल शिंदे-फडणवीस यांच्या बाजूने लागेल आणि निलंबनाबाबत चा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपविला जाईल',असे भाकीत मारटकर यांनी महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात वर्तवले होते.  महाराष्ट्र आणि कर्नाटक बाबत ही दोन्ही भाकिते खरी ठरली आहेत,असे मारटकर यांनी सांगितले. 

भाकित खरे ठरले!, कर्नाटक निकालाबाबत ज्योतिषी सिद्धेश्वर मारटकर यांचा दावा भाकित खरे ठरले!, कर्नाटक निकालाबाबत ज्योतिषी सिद्धेश्वर मारटकर यांचा दावा Reviewed by ANN news network on ५/१३/२०२३ ०२:३०:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".