कोकण : बारसू रिफ़ायनरी लादण्याचा प्रयत्न केलात तर; महाराष्ट्र पेटवू! : उद्धव ठाकरे


रत्नागिरी : "बारसू रिफ़ायनरीला लोकांचा विरोध असल्यास ती होऊ देणार नाही. लादण्याचा प्रयत्न केलात तर महाराष्ट्र पेटवू!" अशा शब्दात  माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज ६ मे रोजी सत्ताधा-यांना ललकारले. 

ठाकरे आज कोकण दौऱ्यावर आहेत. या दरम्यान त्यांनी सोलगाव येथे रिफायनरी विरोधकांशी संवाद साधला. ग्रामस्थांना दिलासा देत ते म्हणाले की, लोकांचा विरोध असल्यास रिफायनरी होणार नाही. मी मन की बात करायला आलो नाही. रिफायनरीसाठी लोकांची डोकी फोडण्याचा डाव आखला जात आहे. मुडदे पाडून विकास होऊ देणार नाही, हुकूमशाही लादण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र पेटवू असे ठाकरे म्हणाले.

रिफायनरी गुजरातला न्या आणि आमचा एअर बस, वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात आणा. वादग्रस्त प्रकल्प महाराष्ट्रात आणि चांगले प्रकल्प गुजरातला गेले. रांगोळी गुजरातला आणि राख महाराष्ट्राला हे चालणार नाही असेही त्यांनी सत्ताधा-यांना ठणकावले.

 समृद्धी महामार्ग होताना देखील मार्ग काढला अनेक शेतकऱ्यांच्या फळबागा नष्ट होत होत्या, मी जाऊन मार्ग काढला, असे उद्धव ठाकरे म्हणाले.



कोकण : बारसू रिफ़ायनरी लादण्याचा प्रयत्न केलात तर; महाराष्ट्र पेटवू! : उद्धव ठाकरे कोकण : बारसू रिफ़ायनरी लादण्याचा प्रयत्न केलात तर; महाराष्ट्र पेटवू! : उद्धव ठाकरे Reviewed by ANN news network on ५/०६/२०२३ ०३:००:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".