मराठवाडा : रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध होत नसल्याने जखमीच्या नातेवाईकांकडून संताप, दोन मंत्र्यांच्या मतदार संघातील प्रकार..

 


 दिलीप शिंदे 

सोयगाव : सोयगाव ग्रामीण रुग्णालयातील जखमींना इतर ठिकाणी उपचारासाठी नेण्यास वेळेवर १०८ ही रुग्णवाहिका  उपलब्ध होत नसल्याचा धक्कादायक प्रकार दि.१९ शुक्रवारी उघडकीस आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.या अगोदरही वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने दोन तीन जखमींना जीव गमवावा लागला आहे. नागरिकांकडून संबंधितास धारेवर धरून देखील कारवाई होत नसल्याने लोकप्रतिनिधीच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एक केंद्रीय राज्यमंत्री तर एक कॅबिनेट मंत्री असे दोन मंत्री मतदारसंघाला लाभले असून देखील सर्व सामान्य जनतेला आरोग्य सुविधा वेळेवर मिळत नसल्याने आरोग्याचे तीनतेरा वाजले आहे.

       याबाबत सविस्तर माहिती अशी तालुक्यातील कंकराळा शिवारातील गट क्रमांक २६ मध्ये शेतकरी रामदास नामदेव आहेर वय ५३ वर्षे रा.मेणगाव जि. जळगाव हे सकाळी सात, साडे सात वाजेच्या दरम्यान विहिरीकडे पाणी आणण्यासाठी जात असतांना  रानडुकराने हल्ला करून त्यांना जखमी केले. दरम्यान नातेवाईकांनी  जखमी शेतकऱ्यास उपचारासाठी सोयगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात यावे असे जखमीच्या नातेवाईकांना ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून  सांगण्यात आले. रुग्णवाहिका (१०८) वर नातेवाईकांनी संपर्क साधला असता १०८ चे दुरुस्तीचे काम चालू आहे तर दुसरी १०८  रुग्णवाहिकेला दोन तीन तास लागतील असे नातेवाईकांना सांगण्यात आले. रुग्णवाहिकांच्या या अनागोंदी कारभारावर नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. वेळेचे भान ठेवीत नातेवाईकांनी खाजगी वाहनाद्वारे जखमीला जिल्हा रुग्णालय जळगाव येथे उपचारासाठी दाखल केले. १०८ रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध न झाल्यामुळे दोन तीन जणांना उपचाराअभावी जीव गमवावा लागला होता. ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी गोरगरीब सामान्य नागरिक उपचारासाठी येत असतात. एक केंद्रीय राज्यमंत्री तर एक कॅबिनेट मंत्री अशा दोन मंत्र्यांच्या मतदारसंघात सर्वसामान्य नागरिकांना आरोग्यासाठी आर्थिक भुदंड सोसावा लागत असल्याने जनतेतून याप्रकरणी संताप व्यक्त केला जात आहे. सर्वसामान्य जनतेला वेळेवर आरोग्य सेवा कधी मिळणार की त्यासाठी संघर्ष करावा लागणार हे मात्र निरुत्तरीत आहे. १०८ रुग्णवाहिकांच्या या अनागोंदी कारभारावर काय कारवाई केली जाते याकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागले आहे.


१०८ रुग्णवाहिके संदर्भात माहिती घेतली असता रुग्णवाहिका ही सोयगाव येथेच होती मात्र रुग्णवाहिकेवर ज्या डॉक्टरांची नियुक्ती केली आहे ते हजर नसल्याने जखमी रुग्णास रुग्णवाहिका देण्यास टाळाटाळ करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आरोग्यविभाग व १०८ रुग्णवाहिका करार असलेल्या बिव्हिजि कंपनी संबंधितावर काय कारवाई करते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

मराठवाडा : रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध होत नसल्याने जखमीच्या नातेवाईकांकडून संताप, दोन मंत्र्यांच्या मतदार संघातील प्रकार.. मराठवाडा : रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध होत नसल्याने जखमीच्या नातेवाईकांकडून संताप, दोन मंत्र्यांच्या मतदार संघातील प्रकार.. Reviewed by ANN news network on ५/२०/२०२३ ०५:५१:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".