पिंपरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कायद्याच्या चौकटीत राहूनच निर्णय घेतला होता. सर्वोच्च न्यायालयाने घटनेच्या आधारावर निकाल दिला आहे. या निकालामुळे शिंदे-फडणवीस सरकारला कोणताही धोका नाही. एकनाथ शिंदे यापुढेही मुख्यमंत्री राहतील अशी प्रतिक्रिया खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकाल दिल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले, या निकालामुळे शिंदे-फडणवीस सरकारला कोणताही धोका नाही. अनेकांकडून तर्कवितर्क लावत सरकार जाईल असे सांगितले जात होते. विरोधी पक्षांनी सरकार पडावे म्हणून देव पाण्यात ठेवले होते. परंतु, तसे काही घडले नाही. सरकारला कोणताही धोका नाही.राज्यातील जनतेच्या हितासाठी काम करण्याची संधी सरकारला मिळाली आहे. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही यापुढेही चांगले कामकाज करणार आहोत. शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्याचा झपाट्याने विकास होईल.
Reviewed by ANN news network
on
५/११/२०२३ ०६:०६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: