पिंपरी : चिंचवड, दत्तनगर येथील रहिवासी शालन किसन कांबळे यांचे २० एप्रिल रोजी अल्प आजाराने निधन झाले. त्या ७० वर्षांच्या होत्या. पत्रकार बाबू कांबळे यांच्या त्या मातु:श्री होत. आजारी असल्याने त्यांच्यावर पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी रविवारी सकाळी साडेअकरा वाजता पिंपरीतील लिंकरोड स्मशानभूमीमध्ये होणार आहे.
शालन कांबळे यांचे देहावसान
Reviewed by ANN news network
on
५/२०/२०२३ ११:४८:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
५/२०/२०२३ ११:४८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: