पाटण : कोयना धरण परिसरात ७ मे रोजी पहाटे ३ वाजून ५३ मिनिटांनी भूकंपाचा धक्का बसला. हा भूकंप ३ रिश्टर स्केलचा होता. भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणाच्या उत्तरेस 50 किलोमीटर अंतरावर होता. भूकंपाची खोली तीस किलोमीटर अंतरावर होती अशी माहिती कोयना धरण व्यवस्थापन केंद्राकडून देण्यात आली आहे.
हा धक्का कोयनानगर, पाटण व चिपळूण तालुक्यात काही ठिकाणी जाणवला. मध्यरात्री अचानकपणे जाणवलेल्या भूकंपामुळे गाढ झोपेत असलेले लोक घाबरून घराबाहेर पडले.या भूकंपात कोणत्याही प्रकारची हानी झाली नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
कोयना धरण परिसरात भूकंपाचा धक्का
Reviewed by ANN news network
on
५/०७/२०२३ १२:५३:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
५/०७/२०२३ १२:५३:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: