गोव्यात डॉ. जयंत आठवले यांचा जन्‍मोत्‍सव भावपूर्ण वातावरणात साजरा

 


    फोंडा :  ‘सनातन संस्‍थे’चे संस्‍थापक डॉ. जयंत आठवले यांचा 81 वा जन्‍मोत्‍सव यंदा ‘ब्रह्मोत्‍सव’ म्हणून साजरा करण्यात आला. गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांतून आलेल्या तब्बल 10,000 हून अधिक साधकांच्या उपस्थितीत हा ब्रह्मोत्‍सव साजरा करण्यात आला. गोव्यातील फर्मागुडी येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्‍या मैदानावर कार्यक्रमाचेआयोजन करण्‍यात आले होते. आंध्रप्रदेशमधील तिरुपतीस्थित श्री बालाजी देवस्‍थानाच्‍या वतीने सुवर्णरथातून श्री तिरुपती बालाजीची जी शोभायात्रा काढण्‍यात येते, तिला ‘ब्रह्मोत्सव’ म्‍हणतात. त्‍याप्रमाणेच या वेळी डॉ. जयंत आठवले यांची रथयात्रा काढण्‍यात आली.

     या सोहळ्‍यासाठी झारखंड येथील प्रदीप खेमका, सुनीता खेमका, दिल्ली येथील  संजीवकुमार, ‘पितांबरी’ उद्योगसमुहाचे रवींद्र प्रभुदेसाई आणि कर्नाटक येथील हिंदुत्‍वनिष्‍ठ अधिवक्ता कृष्णमूर्ती यांनी मनोगत व्‍यक्त केले. तर या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोवा संघचालक   राजन भोबे, म्हार्दाेळ येथील श्री महालसा मंदिरांचे अध्यक्ष  प्रेमानंद कामत, गोमंतक संत मंडळाचे संचालक ह.भ.प. सुहास  वझे, गोमंतक मंदिर महासंघाचे अध्यक्ष  भाई पंडित आणि कोकणी साहित्यिक महेश पारकर आदी  उपस्थित होते.


     कार्यक्रमाच्‍या प्रारंभी वर्ष 2021 मध्‍ये झालेल्या  डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाचा  लघुपट दाखवण्‍यात आला. त्‍यानंतर काढण्यात आलेल्‍या रथयात्रेत धर्मध्‍वज, मंगलकलश घेतलेल्‍या सुवासिनी, ध्‍वजपथक, टाळपथक इत्‍यादी ‘श्रीमन्नारायण नारायण...’ या धुनीवर मार्गक्रमण करत होते. सुवर्णरथात  डॉ. आठवले यांच्यासह त्‍यांच्‍या आध्यात्मिक उत्तराधिकारी  बिंदा सिंगबाळ आणि  अंजली गाडगीळ विराजमान झाल्या होत्या. या वेळी नृत्‍यपथकाने ‘अच्‍युताष्‍टकमा’वर आधारित नृत्‍य सादर केले. त्‍यानंतर ‘आत्‍मारामा आनंदरमणा’ हे गीत सादर करण्‍यात आले. आभारप्रदर्शन आणि रथदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.


गोव्यात डॉ. जयंत आठवले यांचा जन्‍मोत्‍सव भावपूर्ण वातावरणात साजरा गोव्यात डॉ. जयंत आठवले यांचा जन्‍मोत्‍सव भावपूर्ण वातावरणात साजरा Reviewed by ANN news network on ५/१२/२०२३ ०५:१८:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".