पुणे : हवामान खात्याने आज आणि उद्या कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविली आहे. उर्वरित महाराष्ट्रात हवामान कोरडे राहील. महाराष्ट्र आणि गुजराथमध्ये उष्णतेची लाट येण्याचा अंदाजही हवामानखात्याने वर्तविला असून नागरिकांनी शक्यतो उन्हात घराबाहेर पडू नये. बाहेर जायची गरज पडल्यास अंग झाकून घेणारे सैलसर सुती कपडे वापरावेत. वरचेवर पाणी, ताक, लिंबूसरबत आदी घ्यावे असेही आवाहन करण्यात आले आहे.
हवामानाचा अंदाज : कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता
Reviewed by ANN news network
on
५/११/२०२३ ०५:५२:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
५/११/२०२३ ०५:५२:०० PM
Rating:



कोणत्याही टिप्पण्या नाहीत: