भरतभाऊ माळी, उदयशंकर पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश



 

मुंबई : तळोदा ( जि. नंदूरबार ) येथील ज्येष्ठ काँग्रेस नेते,  माजी नगराध्यक्ष भरतभाऊ माळीसोलापूर जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते उदयशंकर पाटीलमराठा क्रांती मोर्चाचे आबा पाटीलसाक्री ( जि. धुळे ) च्या माजी पंचायत समिती सभापती कविता पाटील यांच्यासह विविध पक्षांतील असंख्य कार्यकर्त्यांनी मंगळवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या सर्वांचे स्वागत केले. भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला कामगार मंत्री सुरेश खाडेआ. अमरिशभाई पटेलआ. सुभाषबापू देशमुखआ. विजयकुमार देशमुखसोलापूर जिल्हाध्यक्ष आ. सचिन कल्याणशेट्टीआ. श्रीकांत भारतीयप्रदेश सरचिटणीस माधवी नाईकविजय चौधरीविक्रांत पाटील आदी उपस्थित होते.

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी सांगितले कीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या वेगवेगळ्या निर्णयांमुळे भारताची प्रतिमा जगात उंचावली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सर्व समाजघटकांच्या विकासाचा अर्थसंकल्प मांडून जनकल्याणकारी सरकार कसे असते हे दाखवून दिले आहे. नरेंद्र मोदीदेवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामुळे देशाचेराज्याचे भले होईल अशी खात्री वाटू लागल्यानेच अनेक पक्षातील लोकप्रतिनिधीनेतेसामाजिक कार्यकर्ते,  भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करीत आहेत. या सर्व कार्यकर्त्यांचा पक्षामध्ये योग्य तो सन्मान राखला जाईलअसेही श्री. बावनकुळे यांनी नमूद केले.

भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये सोलापूरच्या दादाश्री प्रतिष्ठानचे गिरीश किवडेउद्योजक रोहन रमेशदादा पाटीलसोमनाथ पाटील तळोद्याच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष लक्ष्मण माळीअनिल मगरेमाजी नगरसेवक जितेंद्र सूर्यवंशीपंकज राणेघोडदे ( ता. साक्री ) च्या माजी सरपंच सौ. अंजाबाई पवारउपसरपंच जयश्री क्षीरसागरमोहन अनगरमराठा महासंघाचे विलास देसाई मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक गणेश काटकरशिवसंग्रामचे प्रदेश उपाध्यक्ष राजन घागविवेक सावंतउद्धव ठाकरे गटाच्या शेतकरी सेनेचे विश्वास सावंतदादासाहेब येडे पाटीलसंतोष चौधरी आदींचा समावेश आहे. 

भरतभाऊ माळी, उदयशंकर पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश भरतभाऊ माळी, उदयशंकर पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश Reviewed by ANN news network on ३/२१/२०२३ ०६:५६:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".