पिंपरी : विविध विकासकामांना प्रशासक शेखर सिंह यांची मान्यता

 


पिंपरी : महापालिका सभा आणि स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेल्या विविध विषयांना प्रशासक  शेखर सिंह यांनी मंजुरी दिली. पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये प्रशासक  शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक संपन्न झाली.  या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.

नवी दिशा योजने अंतर्गत महिला बचत गट / महिला मंडळ यांना शौचालय देखभाल दुरूस्ती करणेच्या कामकाजास, पिंपरी चिंचवड राष्ट्रीय रायफल व पिस्तुल नेमबाजी प्रशिक्षण केंद्र” विकसित करून ते अरुण पाडुळे स्पोर्ट्स प्रमोशन फाउंडेशन, चिंचवड पुणे ४११०१९ यांना १० वर्षाकरिता प्रशिक्षणाकरिता कराराने चालविण्यास देणेस, मौजे वढू बुद्रुक ता.शिरूर जि.पुणे येथील धर्मवीर छत्रपती श्री.संभाजी महाराज यांचे पुण्यतिथी कार्यक्रमासाठी आर्थिक सहाय्य अदा करणेस, प्रभाग क.2 से.क्र.16 राजे शिवाजी नगर मधील रस्ते अद्यावत पध्दतीने करणे अंतर्गत उर्वरीत विद्युत विषयक कामे करणेस, मौजे चिंचवड सि.स.नं.३६६, ३६६/१ ते ७, ३६७ व ३६७/१ या जागेवरील क्रांतीवीर चापेकर स्मारक इमारतीच्या सुधारीत बांधकाम परवानगीसाठीचे विकास शुल्क व प्रशमन शुल्क माफ करणेस, केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिकेमार्फत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आकुर्डी येथे घरे बांधणे या कामांतर्गत विद्युत विषयक कामे करणेस, बोपखेल गावठाणापासून खडकी बझारपर्यंत होणा-या नियोजित उड्डाणपुलाच्या मार्गातील अडथळा ठरणा-या महापारेषण कंपनीच्या अती उच्च दाब उपस्कर खांब व तारा हलविणे व अनुषंगिक कामे करणेकामी वार्षिक परवाना शुल्क अदा करणेस, बोपखेल गावठाणापासून खडकी बझारपर्यंत होणा-या नियोजित उड्डाणपुलाच्या मार्गातील अडथळा ठरणा-या महापारेषण कंपनीच्या अती उच्च दाब उपस्कर खांब व तारा हलविणे व अनुषंगिक कामे करणेकामी पर्यवेक्षण शुल्क अदा करणेस, बोपखेल गावठाणापासून खडकी बझारपर्यंत होणा-या नियोजित उड्डाणपुलाच्या मार्गातील अडथळा ठरणा-या महापारेषण कंपनीच्या अती उच्च दाब उपस्कर खांब व तारा हलविणे व अनुषंगिक कामे करणेकामी वार्षिक भाडेपट्टी अदा करणेस, सिटीझन परसेप्शन सर्व्हे २०२२ च्या जनजागृतीकामी झालेल्या खर्चास, च-होली टप्पा १- २१ एम.एल.डी. व टप्पा २-२० एम.एल.डी. मैलाशुध्दीकरण केंद्राचे चालन, देखभाल व दुरुस्तीचे कामकाज करणेस, मनपाचे प्रभाग क्र.३ च-होली येथील चोविसावाडी येथे अग्निशामक केंद्र बांधणेस, पिंपरी चिंचवड मनपाचे “ब” प्रभागातील जलनि:सारण नलिकांची व चेंबर्सची यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करणे व चोकअप काढणे या कामास, मनपाच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील नियोजित CSSD विभागाकरिता ३०KVA युपीएस खरेदी करणेस, मनपाच्या नविन कै.ह.भ.प. प्रभाकर मल्हारराव कुटे रुग्णालय आकुर्डी रुग्णालयाचे अंतर्गंत व बाहय परीसराची दैनंदिन साफसफाई व स्वच्छता करणेस, मनपाच्या नविन भोसरी रुग्णालयाचे अंतर्गंत व बाहय परीसराची दैनंदिन साफसफाई व स्वच्छता करणेस प्रशासक शेखर सिंह यांनी झालेल्या स्थायी समिती सभेच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली.

या बैठकीनंतर महिनाअखेर सेवानिवृत्त होणा-या सह आयुक्त आशादेवी दुरगुडे यांचा प्रशासक तथा आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दुरगुडे यांची महापालिकेत ३८ वर्षे ८ महिने सेवा झाली आहे.

पिंपरी : विविध विकासकामांना प्रशासक शेखर सिंह यांची मान्यता पिंपरी : विविध विकासकामांना प्रशासक शेखर सिंह यांची मान्यता Reviewed by ANN news network on ३/२१/२०२३ ०७:२०:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".