मेट्रो कॉरिडॉर आणि शहरी पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या क्षेत्रात महामेट्रोचे अप्रतिम कार्य : देवेंद्र फडणवीस
नागपूर : ५१ महिन्यात २४ किमीचे मेट्रो नेटवर्क, इंटिग्रेटेड वापरासाठी मेट्रो रेल्वे प्रकल्पातील पहिली सौर पीव्ही प्रणाली, शहरी भागातील रेल्वे ट्रॅकवर सर्वात जास्त वजनाच्या सिंगल स्पॅन डबल डेकर स्टील ब्रिज ट्रसची स्थापना नोंद घेत आशिया बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थेने आज महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दिक्षित यांना उप मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. मेट्रो भवन येथे आयोजित समारंभात महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित, संचालक सुनील माथूर, अनिल कोकाटे आशिया बुक ऑफ रेकॉर्डच्या प्रतिनिधी डॉ. सुनीता धोटे, डॉ. चित्रा जैन यावेळी उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, मेट्रो कॉरिडॉर आणि शहरी भागात पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या क्षेत्रात महा मेट्रोचे अप्रतिम कार्य केल्याची भावना राज्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. या दरम्यान महा मेट्रोने उल्लेखनीय कार्य केले जसे सर्वात कमी वेळात मोठ्या प्रमाणात मेट्रो कॉरिडॉरचे निर्माण, गड्डीगोदाम येथील रेल्वे मार्गिकेवर सर्वात लांब डबल डेकर पुलाच्या बांधकामाचा समावेश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात संपूर्ण देशात होणाऱ्या कार्यामुळे संपूर्ण देशाला प्रेरणा मिळाली असून डॉ ब्रिजेश दीक्षित यांचं नेतृत्वात नागपूर मेट्रोच्या संपूर्ण टीमने अत्याधुनिक पायाभूत सुविधा निर्माण केली आहे. हि रचना केवळ कलात्मक दृष्ट्या उत्कृष्ट नसून लोकाभिमुख देखील आहे.
मला आनंद आहे कि, महा मेट्रोच्या स्थापनेपासून मी या प्रकल्पाशी जोडला गेलो आहे आणि या पुढे देखील याचं प्रकारे अनोखे कार्य या निमित्ताने होतील हा विश्वास मला आहे . मेट्रो भवन हे उत्कृष्ट स्थापत्य रचनेचे उदाहरण असून या इमारतीला इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल तर्फे सर्वोच्च प्लॅटिनम मानांकन मिळाले आहे. संपूर्ण राज्यात केलेल्या अद्भूत कार्याबद्दल मी संपूर्ण महा मेट्रो टीमने अभिनंदन करतो.
1. सर्वात कमी कालावधीत सर्वात जास्त मेट्रो रेल कॉरिडॉर चे बांधकाम: महा मेट्रोने 51 महिन्यांच्या विक्रमी कालावधीत 24 किमी लांब मेट्रो रेल कॉरिडॉरचे बांधकाम पूर्ण केले. अशा प्रकारे दर दोन महिन्यांत सुमारे एक किमी लांबीच्या ट्रॅकचे बांधकाम नागपूर मेट्रोने केले. मेट्रो प्रकल्पाच्या एकूण 40 किमी लांबी पैकी 24 किमीचे काम 51 महिन्यांत पूर्ण झाले आहे. एकावनाव्या महिन्यात या मार्गिकेवर प्रवासी वाहतूक सुरु झाली. या अंतर्गत 13.50 किमी लांबीच्या उत्तर-दक्षिण कॉरिडॉर मधील सीताबर्डी इंटरचेंज ते खापरी मेट्रो स्टेशनपर्यंत आणि 10.60 किमी लांबीचा पूर्व-पश्चिम कॉरिडॉर मधील लोकमान्य नगर मेट्रो ते सीताबर्डी इंटरचेंजचा समावेश आहे.
2. ‘एकात्मिक वापरासाठी मेट्रो रेल्वे प्रकल्पातील पहिली सोलर पीव्ही प्रणाली: मेट्रो रेल प्रणाली अंतर्गत ऑपरेशन आणि देखभालिव्हर होणाऱ्या खर्चा पैकी एकूण 40% पेक्षा जास्त खर्च उर्जेवर होतो. उर्जेवर होणारा खर्च कमी करण्यासाठी, अक्षय ऊर्जा निर्मिती उपायांचा अवलंब करणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक मेट्रो रेल प्रकल्पांतर्गत होणाऱ्या बांधकामाच्या निमित्ताने छतावर मोठ्या प्रमाणात जागा तयार होते. मेट्रो रेल प्रकल्पाच्या सुरुवातीपासून, सौर ऊर्जा प्रणालीच्या स्थापना द्वारा सौर ऊर्जेचा वापर करण्यासाठी या संसाधनाच्या वापरासाठी होत आहे. या अंतर्गत 31.03.2022 पर्यंत, सोलर पीव्ही सिस्टीमने नागपूर मेट्रो मध्ये 38 लाख युनिट पेक्षा अधिक अक्षय ऊर्जा निर्माण केली आहे. या मुळे दर वर्षी सुमारे 2635 टन कोळसा आणि 129 लाख लिटर पाण्याची बचत होईल. या मुले रु. ५.५ कोटी ची बचत झाली आहे.
3. शहरी भागातील रेल्वे ट्रॅकवर सर्वात जास्त वजनाच्या सिंगल स्पॅन डबल डेकर स्टील ब्रिज ट्रसची
स्थापना: गड्डीगोदाम येथील स्टील ब्रिज ट्रस, डिझाइन, वाहतूक आणि अत्याधुनिक फॅब्रिकेशन आणि लॉन्चिंग तंत्राचा अवलंब करण्याच्या संबंधातील भारतातील प्रकारचे एकमेव रचना आहे. हा १६८० टन स्टीलचा पूल सर्वोच्च गुणवत्तेच्या पोलादापासून बनलेला आहे. येथील भौगोलिक परिस्थिती अश्या प्रकारच्या कामाकरता अतिधाय कठीण असतानाही, यशस्वीपणे येथे उभारणी केली आहे. हे पूल चारस्तरीय वाहतूक प्रणालीचा भाग असून यात पहिल्या दोन मजल्यावर विद्यमान रस्ता आणि रेल्वेचा पूल असून उर्वरित दोन मजल्यांवर उड्डाण पूल आणि मेट्रो मार्गिका आहे.
कार्यक्रमानंतर महा मेट्रोच्या वतीने नागपूर, पुणे मेट्रो रेल प्रकल्पाबद्दल सविस्तर सादरीकरण करण्यात आले ज्याप्रती त्यांनी समाधान व्यक्त केले, तसेच नाशिक येथील मेट्रो नियो रेल प्रकल्पाची माहिती जाणून घेत आवश्य त्या सूचना दिल्यात.
Reviewed by ANN news network
on
३/१९/२०२३ ०६:३५:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: