छत्रपती संभाजी नगरच्या खेळाडूंची सुवर्ण लूट

रतन बी.राऊत 

छत्रपती संभाजी नगर :  5  नॅशनल गेम्स  स्पर्धा  नाशिक येथे  18 आणि 19  या रोजी झाली.  यामध्ये  संपूर्ण भारतातून  जवळपास 400 चे वर स्पर्धा  सहभागी झाले होते. या स्पर्धेमध्ये  छत्रपती संभाजीनगरच्या खेळाडूंनी उस्फूर्तपणे  सहभाग नोंदवून  पदकांची लयलूट केली.

यामध्ये एक सुवर्ण दोन रौप्य आणि पाच कांस्य अशी आठ पदके मिळवली .मुकेश बाशा 50+ या वयोगटामध्ये 200 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक मध्ये  कांस्यपदक 200 मीटर आय एम मध्ये कांस्यपदक, राजेंद्र बाशा यांनी 60 प्लस या वयोगटामध्ये 100 मीटर  बेस्ट स्ट्रोक मध्ये कांस्यपदक व 50 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक मध्ये रौप्यपदक, देविदास झिटे 50 प्लस या वयोगटामध्ये 200 मीटर बॅग स्ट्रोक रौप्यपदक 100 मीटर बॅक स्ट्रोक मध्ये सुवर्णपदक, नागार्जुन राव आकुला 50 मीटर बॅक स्ट्रोक मध्ये कांस्यपदक  तसेच विजू खंडागळे 30 प्लस 200 मीटर बेस्ट स्ट्रोक कांस्यपदक  मिळविले.

 ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मास्टर्स गेम्स फेडरेशनचे बाळा चव्हाण, दिनेश जयस्वाल ,विनोद कुमार, मुकेश बाशा, प्रभाकर दुबे, केतन डिसिल्वा, राजेंद्र निंबाळते, मार्टिन डिकोस्टा या सगळ्यांनी श्रम घेतले.

छत्रपती संभाजी नगरच्या खेळाडूंची सुवर्ण लूट छत्रपती संभाजी नगरच्या खेळाडूंची सुवर्ण लूट Reviewed by ANN news network on ३/२२/२०२३ ०४:२४:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".